नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फ्रेंस पक्षाचे नेते फारूक अब्दुल्ला यांच्याविरोधात ईडीने कारवाई केली आहे. जम्मू-काश्मीर क्रिकेट घोटाळा प्रकरणात संचालनालयाकडून (ईडी) अब्दुल्ला यांची जवळपास 12 कोटींची संपत्ती जप्त करण्यात आली आहे. यात 3 घरे, 2 प्लॉट आणि 1 व्यावसायिक मालमत्तेचा समावेश आहे. या संपत्तीत त्यांचं श्रीनगरमधील गुपकार रोडवरील घर आणि इतर व्यवसायिक इमारतींचा समावेश आहे.
2005 ते 2011 पर्यंत JKCA ला बीसीसीआयकडून एकूण 109.78 कोटी रुपये मिळाले. या काळात म्हणजेच 2006 ते जानेवारी 2012 मध्ये फारूक अब्दुल्ला JKCA चे अध्यक्ष होते. त्यांनी आपल्या पदाचा दुरुपयोग करत बेकादेशीर निुयक्त्या केल्या, असा आरोप त्यांच्यावर आहे.
फारूख अब्दुल्ला यांची जम्मू-काश्मीर क्रिकेट असोसिएशनमधील निधीच्या गैरव्यवहार प्रकरणी ऑक्टोबरच्या सुरुवातीला अंमलबजावणी संचालनालयाने चौकशी केली होती.
फारूक अब्दुल्ला यांची संपत्ती जप्त केल्यानंतर त्यांचे पुत्र आणि माजी मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी प्रतिक्रिया दिली असून, जप्त केलेली बहुतांश संपत्ती या 1970 च्या दशकातील वडिलोपार्जित संपत्ती असल्याचे त्यांनी म्हटले आहे.