जळगाव – माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केल्यानंतर जळगावमध्ये भाजपला पहिला हादरा दिला आहे. जिल्ह्यातील 60 भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे.
एकनाथ खडसेंनी राष्ट्रवादी प्रवेश करून काही दिवस होत नाही तेच जळगाव जिल्ह्यातील भाजपचे कार्यकर्ते गळाला लागले आहे. रावेर तालुक्यातील 60 भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी रोहिणी खडसे – खेवलकर यांच्या मुक्ताईनगर येथील निवासस्थानी एकनाथ खडसे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे जिल्ह्यात राष्ट्रवादीमध्ये पदाधिकारी व कार्यकर्त्यांची इन्कमिंग सुरू झाली आहे.
एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यामुळे भाजपला आधीच मोठा धक्का बसला आहे. खडसे यांच्या राष्ट्रवादीत प्रवेशामुळे उत्तर महाराष्ट्रात भाजपला खिंडार पडणार, अशी शक्यता वर्तवली जात होती. आता अखेर 60 भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे एकनाथ खडसेंनी राष्ट्रवादीत प्रवेश करून भाजपवर ‘सर्जिकल स्ट्राईक‘ केल्याचे बोलले जात आहे.