भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. आपण पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे असं खडसे यांनी मुक्ताईनगर येथे पत्रकारांशी संवाद साधताना म्हटलं. एकनाथ खडसे आता लवकरच राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. त्यांच्या पाठोपाठ कन्या रोहिणी खडसे-खेवलकर यांनाही राष्ट्रवादी प्रवेशाचे वेध लागल्याचे दिसत आहे
रोहिणी खडसे यांनी आपल्या फेसबुक अकाऊंटवर नवा फोटो शेअर केला आहे. यामध्ये त्या मनगटावरील घड्याळाकडे बघताना दिसतात. राष्ट्रवादीचे निवडणूक चिन्ह असलेल्या घड्याळाचा फोटो ठेवत त्यांनी एकप्रकारे आपली पुढील राजकीय वाटचालच सांगितली आहे.
तसेच रोहिणी खडसे-खेवलकर यांनी मीही भाजपला राजीनामा देऊन राष्ट्रवादी साठी काम करणार असल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच त्यांच्या फेसबुक अकाऊंटवर फोटो शेअर केलेल्या फोटोवरून हे अजून स्पष्ट झाल्याचे दिसत आहे