IMPIMP
Eknath Khadse has asked if you went with BJP for Hindutva, then why do you want ministership Eknath Khadse has asked if you went with BJP for Hindutva, then why do you want ministership

“हिंदुत्वासाठी भाजपसोबत गेलेत ना, मग तुम्हाला मंत्रिपद कशासाठी हवंय?”

जळगाव :  मंत्रीमंडळाचा विस्तार लवकरच होणार असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. मात्र मंत्रिपदासाठी शिवसेना आणि भाजपच्या आमदारांमध्ये मतभेत होत असल्याची चर्चा सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेने हिंदुत्वाचा मुद्दा सोडला,  त्यामुळे आम्ही शिवसेनेतुन बाहेर पडत भाजप सोबत आलो आहोत, असा दावा बंडखोर आमदारांनी केला होता. जर त्यांचा हिंदुत्वाचा मुद्दा आहे तर मग आता मंत्रिपदासाठी हेच आमदार भांडणे का करीत आहेत, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार एकनाथ खडसे यांनी बंडखोर आमदारांना केला आहे.

“भेट शिवतीर्थ, दादरला झाली अन् चक्क धुर बारामतीवरून निघाला” 

याविषयी पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, शिवसेनेच्या आमदारांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून बाहेर पडत भाजपशी युती केली. उद्धव ठाकरे यांच्यावरच्या नाराजीमुळे पक्ष सोडला. आमची विकास कामे होत नाही, म्हणून आम्ही बाहेर पडतो आहोत अशी वेगवेगळी कारणे सांगण्यात आली. त्यामुळे हिंदुत्वाचा मुद्दा महत्वाचा मानला तर आता या बंडखोर आमदारांनी मंत्रीमंडळात आम्हाला घ्या,  असं सांगायची काही गरज नाही. हिंदुत्वावर आले ना, मग हिंदुत्व हेच तुमच ध्येय पाहिजे, असा टोला एकनाथ खडसे यांनी लगावला आहे.

“माझी काय हकालपट्टी करणार, मीच सेनेतून बाहेर पडलो”; विजय शिवतारे

राज्यातील सरकारने महाविकास आघाडी सरकारच्या नामांतरणाच्या निर्णयावर दिलेल्या स्थगितीवर ते म्हणाले की, कोणतेही नवीन सरकार आले तर ते जुन्या सरकारच्या कामांना स्थगिती देते. परंतु काही निर्णयाला दिलेली स्थगिती तात्पुरती असावी,  असं वाटते असंही एकनाथ खडसे म्हणाले. त्यामुळे हे निर्णय सरकारला परत घ्यावे लागतील, असं माझे मत आहे. मात्र जर विकासकामांना स्थगिती दिली तर सामान्य जनतेचे मोठ्या प्रमानात नुकसान होईल असंही एकनाथ शिंदे म्हणाले.

“दिल्लीने तुमचा बकरा केला, हिम्मत असेल तर लाथ मारून बाजुला व्हा” 

दरम्यान,  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळाची शनिवारी बैठक घेण्यात आली. या मंत्रिमंडळाच्या बैठकीत औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबादचे धाराशिव नामांतराच्या निर्णयाला मंजुरी देण्यात आली आहे. यावरून आता दोन मंत्र्यांच्या कॅबिनेटमध्ये नामंतराबाबत जे निर्णय घेतले हेच काही  दिवसांपुर्वी माविआ सरकारने घेतले होते. माविआ अल्पमतातील सरकारचे निर्णय असं आपण जरी म्हणाला तरी कोर्टाचा निर्णय येईपर्यंत तुम्हा दोघांचे सरकार तरी टिकेल का? असा सवाल राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांनी शिंदे सरकारला केला आहे.

Read also