जळगाव : जेष्ठ नेते हे फक्त उत्तर महाराष्ट्राचे नेते नसून त्यांची ताकद संपूर्ण महाराष्ट्रात आहे, आणि त्याचा फायदा संपूर्ण महाराष्ट्रात राष्ट्रवादीला नक्कीच होईल, याचा मोठा फटका भाजपला बसणार आहे. खडसेंची काय ताकद आहे हे लवकरच भाजप आणि फडणवीसांना कळेल असं वक्तव्य गृहमंत्री अनिल देशमुख यांनी जळगावात केलं आहे.
काही दिवसांपूर्वी भाजप नेते एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता, राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर आता एकनाथ खडसे यांनी पक्षबांधणी करण्यास सुरुवात केली आहे. त्याच अनुषंगाने जळगावात आयोजित एका कार्यक्रमात गृहमंत्री अनिल देशमुख बोलत होते. आगामी महापालिका आणि इतर निवडणुकांमध्येही एकनाथ खडसेंचा फायदा राष्ट्रवादीला होण्याची शक्यता आहे.
दरम्यान आज कर्नाटक राज्याचा स्थापना दिन असल्याने महाराष्ट्र सरकारमधील सर्व मंत्री आज काळ्या फिती लावून काम करत आहेत. संदर्भात नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी आधीच एक जीआर काढून आम्ही अशा पद्धतीने कर्नाटक सरकारच्या जुलमी कारभाराचा विरोध करणार असल्याचं घोषित केलं होते.
पण आज बेळगाव आणि कारवार चा प्रश्नाला आम्ही पुन्हा पाटलावर आणण्यासाठी प्रयत्नशील आहोत असं सांगताना राज्यातील जनता सीमाभागातील मराठी भाषिकांच्या पाठीशी भक्कमपणे उभी असल्याची प्रतिक्रिया अनेक महाविकास आघाडीच्या मंत्र्यांनी दिली आहे.
बेळगावमध्ये काळा दिवस पाळण्यास कर्नाटक पोलिसांनी मनाई केली. बेळगाव इथल्या शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात निषेधाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मात्र, आज शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी एकत्र जमण्यास मज्जाव करण्यात आला. शिवसेना कार्यालयाबाहेर कर्नाटक पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला. याच एकंदर परिस्थितीची माहिती एकनाथ शिंदे यांनी तेथील शिवसैनिकांकडून घेतली.
बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर, भालकीसह संयुक्त महाराष्ट्राच्या मागणीसाठी गेली 62 वर्षे सीमावासियांना लढा सुरु आहे. या लढाच्या पार्श्वभूमीवर आज 1 नोव्हेंबरला मराठी भाषिकांकडून काळा दिवस पाळला जातो. याच पार्श्वभूमीवर शिवसेना नेते मंत्री एकनाथ शिंदे यांनी बेळगावातील शिवसैनिकांशी फोनवरुन संवाद साधला. यावेळी बेळगावसह सीमाभाग लवकरच महाराष्ट्रात येईल, अशा शब्दात त्यांनी शिवसैनिकांना आश्वस्त केलं.
Read Also ;
बेळगावसह सीमाभाग लवकरच महाराष्ट्रात: मंत्री एकनाथ शिंदे https://t.co/kTPvAzS16x @mieknathshinde @CMOMaharashtra
— Political महाराष्ट्र (@PoliticalMH) November 1, 2020