मुंबई : “मी ब्राह्मणाला मुख्यमंत्रीपद दान दिलं, या वक्तव्यावरून वाद निर्माण होताच राष्ट्रवादी कॉँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी ब्राह्मण समाजाची माफी मागितली आहे.
दि. ६ नोव्हेंबर २०२० रोजी मी सभेमध्ये जे बोललो, त्याचा विपर्यास केला गेला. ब्राह्मण समाजासह अन्य सर्वच समाजांचा मी माझ्या राजकीय आयुष्यात नेहमीच आदर केला आहे. झालेल्या विपर्यासामुळे ब्राह्मण समाजातील बांधवांच्या भावनांना जर ठेच पोहचली असेल तर मी दिलगिरी व्यक्त करतो.
— Eknath Khadse (@EknathGKhadse) November 9, 2020
या पार्श्वभूमीवर खडसे यांनी ट्विटरवरून ब्राह्मण समाजासंदर्भात केलेल्या वक्तव्याबाबत माफी मागितली आहे. 6 नोव्हेंबर 2020 रोजी मी सभेमध्ये जे बोललो, त्याचा विपर्यास केला गेला. ब्राह्मण समाजासह अन्य सर्वच समाजांचा मी माझ्या राजकीय आयुष्यात नेहमीच आदर केला आहे. झालेल्या विपर्यासामुळे ब्राह्मण समाजातील बांधवांच्या भावनांना जर ठेच पोहचली असेल तर मी दिलगिरी व्यक्त करतो, असे त्यांनी म्हटले आहे.
ब्राह्मण बांधवांच्या भावना दुखावण्याचा आपला कोणताही हेतू नव्हता. मी कायमच ब्राह्मणांचा आदर केला आहे, असे खडसेंनी ट्विट करत स्पष्ट केले आहे. तीन दिवसांपूर्वी एका जाहीर कार्यक्रमात बोलताना फडणवीसांच्या जातीचा उल्लेख करत, मी ब्राह्मणाला मुख्यमंत्रीपद दान दिलं असे वक्तव्य त्यांनी केले होते. यामुळे ब्राह्मण महासंघ कमालीचा संतप्त झाला असून पुण्यात