भाजपचे माजी नेते एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाण्याचा निर्णय घेतल्यानंतर महाविकासआघाडीतील सर्व नेत्यांनी एकनाथ खडसेंच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. यावर आता शरद पवार यांचे नातू आणि राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी देखील भाजपला जोरदार टोला लगावत आपली प्रतिक्रिया दिली आहे.
रोहित पवार यांनी एकनाथ खडसे यांना वेलकम म्हणत राष्ट्रवादीत त्यांचे स्वागत केलेय. तर दुसरीकडे रोहित पवार यांनी वर्षभरापूर्वी राष्ट्रवादी संपली असे म्हणणाऱ्या विरोधकांना टोलाही लगावला.
राष्ट्रवादी काँग्रेसला ओहोटी लागली’, अशा बातम्या वर्षभरापूर्वी येत होत्या. पण निसर्गाचाच नियम आहे, ओहोटी संपल्यानंतर भरती सुरु होते, असे रोहित पवार यांनी म्हटले. आता रोहित पवार यांच्या या वक्तव्याचा नक्की काय अर्थ लावायचा, याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसला ओहोटी लागली', अशा बातम्या वर्षभरापूर्वी येत होत्या. पण निसर्गाचाच नियम आहे, ओहोटी संपल्यानंतर भरती सुरु होते.
WelCome
एकनाथ खडसे साहेब!@EknathGKhadse pic.twitter.com/IYjsVQ8ZMy
— Rohit Pawar (@RRPSpeaks) October 21, 2020
दरम्यान, एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशावर शिक्कामोर्तब झाल्यानंतर त्यांच्या बंगल्यावर समर्थक, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची रेलचेल सुरु झाली आहे. अनेक कार्यकर्त्यांमध्ये खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाची उत्सुकता असून राजकीय भूकंप करण्यासाठी फौज सज्ज झाल्याचं ही पाहायला मिळत आहे. “नाथाभाऊ जो काही निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल,” अशी भावना एकनाथ खडसेंचे कार्यकर्ते व्यक्त करत आहे.