औरंगाबाद ; भाजप नेते एकनाथ खडसे यांनी शिवसेनेत यावं अशी खुली ऑफर धुळेचे पालकमंत्री आणि शिवसेनेचे नेते अब्दुल सत्तार यांनी दिली आहे.
कट्टपाने बाहुबलीला का मारले ? हे सगळ्यांना माहित आहे त्यामुळे खडसेंच काय झालं हे नव्याने सांगायला नको त्यांनी भाजप सोडून शिवसेनेत यायला हवं आम्ही त्यांचे स्वागत करू , असे सत्तार म्हणाले आहेत.
” एकनाथ खडसे कधीही संपणार नाहीत , राजकारणात एखादा अपघात होतो आणि त्यामुळे माणूस मागे पडतो. मात्र खडसेंवर खरंच अन्याय झाला आहे . त्यांचं भवितव्य चांगले आहे त्यांनि शिवसेनेत यावं आम्ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी निश्चित बोलू, असेही सत्तार म्हणाले.