IMPIMP
Eknath' of Pimpri-Chinchwad dominates 'Matoshri' in Mumba Eknath' of Pimpri-Chinchwad dominates 'Matoshri' in Mumba

Ground Report : पिंपरी-चिंचवडच्या ‘एकनाथ’चा मुंबईतील ‘मातोश्री’वर दबदबा ! दिग्गज नेते ‘मशाल’हातात घेण्याच्या तयारीत

पिंपरी । विशेष प्रतिनिधी लोकसभा निवडणुकीत राज्यातील राजकीय समीकरणे वेगाने बदलली आहेत. महायुती ‘बॅक फूट’वर असल्यामुळे महाविकास आघाडीत ‘इनकमिंग’ वाढणार आहे. विशेषत: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे राज्य संघटक एकनाथ पवार यांच्या माध्यमातून महायुतीला मोठा धक्का देण्याची रणनिती आखण्यात आली आहे. किंबहुना, मुंबईतील ‘मातोश्री’वर पिंपरी-चिंचवडच्या ‘एकनाथ’चा दबदबा असून, महायुतीतील ‘बडे मासे’ त्यांच्या गळाला लागले आहेत.

हेही वाचा…राज्यातील ‘या’ सहा खासदारांनी घेतली मंत्रीपदाची शपथ, मोदी तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान 

मावळ लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या तिकीटावर लढण्यासाठी भाजपाचे माजी नगरसेवक संदीप वाघेरे प्रचंड इच्छुक होते. वर्षभरापूर्वीपासूनच त्यांनी निवडणुकीची तयारी व वातावरण निर्मिती केली होती. मात्र, ऐनवेळी माजी महापौर संजोग वाघेरे यांचा ठाकरे गटात प्रवेश घडवण्यात आला. त्यांना प्रवेशावेळीच लोकसभा उमेदवारी देण्याची घोषणा करण्यात आली. राज्यातील ४८ पैकी ३० जागा महाविकास आघाडीने जिंकल्या आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीत हाच ‘ट्रेंड’ राहील, असा दावा केला जात आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवडमधील महायुतीच्या इच्छुकांमध्ये प्रचंड अस्वस्थता आहे.

हेही वाचा…“आम्ही देखील त्यांच्या शब्दावर राहू, थोडा धीर ठेवू”, कॅबिनेट मंत्री न मिळाल्यानंतर पटेलांचं विधान 

चिंचवड विधानसभा मतदार संघात महायुतीकडून विद्यमान आमदार अश्विनी जगताप, भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप, राष्ट्रवादीतील माजी विरोधी पक्षनेते नाना काटे, माजी नगरसेवक भाऊसाहेब भोईर, मोरेश्वर भोंडवे इच्छुक आहेत. तसेच, शिवसेनेचे माजी गटनेते राहुल कलाटे यांनी अद्याप आपली राजकीय भूमिका निश्चित केलेली नाही. महाविकास आघाडीकडून शरद पवार गटाचे तुषार कामठे निवडणुकीसाठी इच्छुक असल्याचे बोलले जाते.

भोसरी विधानसभा मतदार संघात महायुतीकडून भाजपाचे विद्यमान आमदार महेश लांडगे, राष्ट्रवादीचे माजी आमदार विलास लांडे, अजित पवार गटाचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे इच्छुक आहेत. महाविकास आघाडीकडून शिवसेना ठाकरे गटाचे माजी नगरसेवक धनंजय आल्हाट, माजी गटनेत्या सुलभा उबाळे यांनी निवडणुकीची तयारी सुरू केली आहे.

पिंपरी विधानसभा मतदार संघात महायुतीकडून राष्ट्रवादी अजित पवार गटाचे विद्यमान आमदार अण्णा बनसोडे, भाजपाचे निवडणूक प्रमुख अमित गोरखे इच्छुक आहेत. महाविकास आघाडीकडून शरद पवार गटाच्या माजी नगरसेविका सुलक्षणा शिलवंत, ठाकरे गटाचे माजी आमदार गौतम चाबुकस्वार इच्छुक आहेत. दुसरीकडे, भाजपाच्या माजी नगरसेविका सीमा सावळे यांनी आपली भूमिका गुलदस्त्यात ठेवली आहे.

स्थानिक, प्रस्थापितांना धक्का देण्याची तयारी…

शहरातील तीनही मतदार संघात महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये विधानसभेसाठी इच्छुकांची रस्सीखेच आहे. यामध्ये ‘विनिंग कँडिडेट’ फोडून ठाकरे गटात घेण्यासाठी शिवसेना ठाकरे गटाचे राज्य संघटक एकनाथ पवार ‘मातोश्री’च्या संपर्कात आहेत. किंबहुना, ‘मातोश्री’वर पवार यांच्या शब्दाला मोठा मान आहे. महायुतीमध्ये संधी न मिळालेला तगडा उमेदवार महाविकास आघाडीकडून मैदानात उतरण्यासाठी चाचपणी सुरू आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकालांमधील निरीक्षणांनुसार, शहरातील प्रस्थापित अर्थात नवनिर्वाचित खासदार श्रीरंग बारणे, चिंचवडच्या आमदार अश्विनी जगताप, भाजपाचे शहराध्यक्ष शंकर जगताप, माजी विरोधी पक्षनेते नाना काटे, माजी गटनेते राहुल कलाटे, भोसरीतील आमदार महेश लांडगे, माजी आमदार विलास लांडे, पिंपरीतील आमदार अण्णा बनसोडे अशा प्रस्थापितांना धक्का देण्याची तयारी आहे. यासह नव्या व प्रभावी चेहऱ्यांना संधी देण्याबाबत महाविकास आघाडीचा कल दिसत आहे.

READ ALSO :

हेही वाचा…“शिवसेनेच्या बाबतीत भाजपने केंद्रात दुजाभाव केला,” श्रीरंग बारणेंकडून खदखद व्यक्त 

हेही वाचा..विनोद तावडेंवर भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची धुरा ? विनोद तावडेंचं दिल्लीत वाढलं वजन 

हेही वाचा..मोठी बातमी…! “पंतप्रधान पदाचा कारभार स्विकारल्यानंतर मोदींचा पहिलाच शेतकऱ्यांसाठी निर्णय” 

हेही वाचा…“‘त्या’ पुण्याईनं तुझ्यासाठी लोकसभेची दारं उघडली”, मोहोळांसाठी खास मित्राची पोस्ट 

हेही वाचा…राज्यात आघाडीचंं वारं वाहू लागलं..! एकनाथ शिंदे अन् अजित पवार गटातील ४० आमदारांची लवकरच घरवापरी