IMPIMP
Eknath Shinde gave a big confession mentioning Modi Eknath Shinde gave a big confession mentioning Modi

“नाशकात कांद्याने आम्हाला रडवलं,” मोदींचा उल्लेख करत एकनाथ शिंदेंनी दिली मोठी कबुली

मुंबई : लोकसभा निवडणुकीत भाजपने चारसे पार चा नारा दिला. त्याचा वारंवार भाजपच्या नेत्यांकडून उल्लेख करण्यात आला. याला विरोध म्हणून विरोधकांनी भाजपला ४०० जागा मिळाल्या तर संविधान धोक्यात येईल. त्यांना संविधान बदलण्यासाठी ४०० जागा हव्या आहेत. असा प्रचार विरोधकांकडून करण्यात आला. त्याचा परिमाण देखील लोकसभेच्या निकालात दिसून आला. भाजपला पुर्णपणे बहुमत मिळालं नाही. परंतु एनडीएला फक्त २९३ जागांवर समाधान मानावं लागलं. यातच आता राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपला पराभव मान्य केला आहे.

हेही वाचा…कोण होणार लोकसभेचे अध्यक्ष ? आंध्र प्रदेशच्या ‘या’ महिलेची जोरदार चर्चा 

लोकसभा निवडणुकीत विरोधकांकडून काही नरेटिव्ह सेट करण्यात आले. याचा परिमाण म्हणून महाराष्ट्रात देखील एनडीएच्या जागा कमी झाल्यात. यातच संविधान बदलण्याचा प्रचार विरोधकांकडून करण्यात आला. यातच चारशे पारचा नारा लोकांच्या मनात एकदम घुसला आणि पुढे काही तरी गडबड होईल. असं वाटू लागलं. निवडणुकीत आम्हाला याचा मोठा त्रास झाला. नाशिकमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेत कांद्याचा प्रश्न मोठा निर्माण झाला. नाशकात कांद्यांने आम्हाला रडवलं तर मराठवाड्यात कापूस सोयबीनमुळे फटका बसला. असेही एकनाथ शिंदे म्हणाले.

हेही वाचा..राज्यातील ‘सहा’ मंत्र्यांवर सोपविली विविध खात्याची जबाबदारी, वाचा सविस्तर 

दरम्यान, देशात पुन्हा नरेंद्र मोदी यांचं सरकार येईल. असं सर्वांना वाटू लागलं होतं. यातच भाजपने चारसे पार चा नारा दिला. त्यानंतर विरोधकांकडून संविधान बदलण्यासंदर्भात प्रचार करण्यात आला. याचा परिमाण म्हणून भाजपच्या जागा कमी झाल्यात. तर कॉंग्रेसच्या लोकसभेच्या जागा वाढल्या. यातच आता विरोधक देखील भक्कम स्थितीत आले आहेत.

READ ALSO :

हेही वाचा…“शरद पवार तुम्ही काँग्रेसच्या कुबड्यांवर आयुष्यभर राजकारण केल” 

हेही वाचा…“तुझं स्थान माझ्या आयुष्यात खास होत आणि नेहमी राहील”, रक्षा खडसेंसाठी प्रितम मुंडेंची खास पोस्ट 

हेही वाचा..“मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण द्या,” अजितदादाच्या आमदाराची पत्राद्वारे मागणी 

हेही वाचा…“राज्याच्या मंत्रिमंडळ विस्तारात आम्हालाही स्थान द्या”, सदाभाऊंची मोठी मागणी 

हेही वाचा..“सगळ्यात आधी नरेंद्र मोदींनी “त्या” दोन अतृप्त आत्म्यांची शांती करायला हवी”