IMPIMP

शिंदेंचं बंड लोकांना आवडलं नाही ? ठाकरेंचे उमेदवार आघाडीवर

शिंदेंचं बंड लोकांना आवडलं नाही ? ठाकरेंचे उमेदवार आघाडीवर

मुंबई : राज्यात झालेली पक्ष फुट लोकांना आवडलेली दिसून येत नाही. कारण लोकसभेच्या निकालात एकनाथ शिंदे यांचे अनेक उमेदवार पिछाडीवर असल्याचे दिसून येत आहे तर ठाकरे गटाचे अनेक उमेदवारांनी आघाडी घेतली आहे. यातच ईशान्य लोकसभा मतदारसंघातून आता पर्यंत संजय दिना पाटील यांना 24082 मतं, तर भाजपचे मिहीर कोटेचा यांना 19158 मतं पडली आहेत तर तिसऱ्या क्रमांकावर नंदेश उपम यांना फक्त 390 मतं पडली आहेत. यातच संजय दिना यांनी आतापर्यंत12288 मतांनी आघाडी घेतली आहे.

यवतमाळ-वाशीम मतदारसंघातून तिसऱ्या फेरीदरम्यान ठाकरे गटाचे संजय देशमुख १२३६२ मतांनी आघाडीवर आहेत. शिवसेना UBT उमेदवार ओमराजे निंबाळकर यांनी पार केला 1 लाख मतांचा टप्पा. यातच धाराशिव मध्ये चौथ्या फेरीच्या सुरुवातीला ओमराजे यांना मिळाली 1 लाख 3 हजार मते पडली आहेत. यात दोन्ही उमेदवारात 44 हजार मतांचा फरक आहे.

दरम्यान, दक्षिण मध्य मुंबईत सुरुवातीपासून आघाडीवर असलेले राहुल शेवाळे आता पिछाडीवर गेले आहेत. अनिल देसाईंनी मुसंडी मारली असून ते 3 हजार 149 मतांनी आघाडीवर आहेत.