पुणे : बिहार निवडणुकीच्या प्रचारादरम्यान भारतीय जनता पक्षाकडून बिहार मधील नागरिकांना मोफत लस देण्याचे आश्वासन देण्यात आले. भाजपच्या या आश्वासनाच्या विरोधात विरोधकांनी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे दाद मागितली होती आणि भाजप वर कारवाई करण्याची मागणी केली होती.
परंतु निवडणूक आयोगाने ही मागणी फेटाळून लावली आणि भारतीय जनता पक्षाने दिलेले मोफत आश्वासन हे आयडियल कोड ऑफ कण्डक्टचे उल्लंघन नसल्याचं म्हटलं. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी निवडणूक आयोग म्हणजे भाजपची एक शाखा असल्याची टीका केलीय. बिहार निवडणुकीच्या अनुषंगाने खासदार राऊत यांनी ही टीका केली आहे. यावरती प्रतिक्रिया देताना खासदार संजय राऊत यांनी निवडणूक आयोग म्हणजे भाजपची एक शाखा असल्याचं म्हटलंय.
सरकार लोकनियुक्त आहे, लोकांनी निवडून दिलेलं सरकार आहे, कोणत्याही प्रश्नासाठी पहिल्यांदा संबंधित खात्याच्या मंत्र्यांना त्यानंतर मुख्यमंत्र्यांना भेटलं पाहिजे, राज्यपालांना कार्यकार अधिकार नाही त्यामुळे महाराष्ट्राचे प्रश्न घेऊन राज्यपालांना भेटणं हाच महाराष्ट्राचा अपमान आहे, अशा शब्दात संजय राऊत यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना टोला लगावला आहे पुण्यात पत्रकारांशी संवाद साधला त्यावेळी त्यांनी हे भाष्य केले आहे.
आमचं हिंदुत्व राजकीय नाही, घंटा बडवली अने शेंडी ठेवली म्हणजे हिंदुत्व नाही. शिवसेनेची चळवळ मराठी माणसाची जोडली आहे. आम्ही राजकारणात पदं मिळावी म्हणून आलो नाही, ही चळवळ वाढली पाहिजे, महाराष्ट्राच्या गावागावात पोहचली पाहिजे यासाठी आम्ही काम केले. शिवसेनेला कोणी हिंदुत्व शिकवू नये, आजही आक्रमकपणे आम्ही हिंदुत्व मांडतो असा घणाघात देखील यावेळी संजय राऊत यांनी केला आहे.
शिवसेना खासदार संजय राऊत हे पुणे श्रमिक पत्रकार संघाने आयोजित केलेल्या वार्तालापासाठी पुण्यात आले होते. राज्यातील महा विकास आघाडीचे सरकार हे स्थिर असल्याचा त्यांनी पुनरुच्चार केला. अशोक चव्हाण यांनी काँग्रेसच्या ताब्यात असलेल्या महापालिकांना निधी मिळत नसल्याचं वक्तव्य परभणी येथे काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात केलं आहे.
त्याबद्दल खासदार संजय राऊत यांना विचारलं असता नांदेड महापालिकेचा विषय असेल तर स्वतः मुख्यमंत्री त्यामध्ये लक्ष घालतील असं म्हटलं आणि काँग्रेसच्या मजबूत पाठिंब्यावर महाविकास आघाडीचे सरकार उभा असल्याचं सांगितलं.
Read Also ;
माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांचा स्टार प्रचारकाचा दर्जा निवडणूक आयोगानं काढलाhttps://t.co/VNnEgQe8Dz @OfficeOfKNath @BJP4Maharashtra @BJP4MP @ChouhanShivraj @INCMaharashtra
— Political महाराष्ट्र (@PoliticalMH) October 31, 2020