IMPIMP
devendra fadnavis vs uddhav thackeray devendra fadnavis vs uddhav thackeray

विधानसभेआधीच ठाकरे गटाकडून भाजपला फोडण्यास सुरूवात, ६ ते ८ नगरसेवक ठाकरे गटात करणार प्रवेश

छत्रपती संभाजीनगर : उद्धव ठाकरे गट छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपला मोठा धक्का देण्याच्या तयारीत आहेत. भाजपचे सहा ते आठ माजी नगरसेवक ठाकरे गटाच्या वाट्यावर असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या आधी ठाकरे गटाकडून आता भाजपला फोडण्यास सूरूवात झाली असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

हेही वाचा..“प्राधिकरणाच्या मालमत्ता होणार फ्री होल्ड ;” महेश लांडगे यांनी मांडलेल्या लक्षवेधीवर सामंताचं उत्तर 

रविवारी छत्रपती संभाजीनगरमध्ये उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसंकल्प मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यामध्ये भाजपचे सहा ते आठ नगरसेवक ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत. शिवसेना ठाकरे गटाकडून भाजपला याठिकाणी एक मोठा धक्का देण्यात येणार आहे. भाजपचे माजी उपमहापौर राजू शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसंकल्प मेळाव्यात नगरसेवक प्रवेश करणार आहेत. ठाकरे गटात जाणारे सर्व नगरसेवक हे भाजपचे आमदार अतुल सावे यांच्या मतदारसंघातील आहेत. त्यामुळे हा अतुल सावे यांना देखील धक्का मानला जात आहे. शिवसेना ठाकरे गटाकडून आता भाजपला फोडण्याची सुरूवात झाली आहे.

हेही वाचा…“सभागृहात उद्यापासून त्याच आक्रमकतेने …” अंबादास दानवेंचं निलंबन मागे 

अतुल सावे यांच्यासह शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाठ यांचीही अडचण वाढणार असल्याचे बोलले जात आहे. नगरसेवकांमध्ये उपमहापौर, स्थायी समितीच्या सभापती राहिलेल्या नगरसेवकांचा समावेश आहे. यातील एका नगरसेवकांना गत निवडणुकीमध्ये विधानसभा ही लढवलेली होती. ६ ते ८ माजी नगरसेवक, १ जिल्हा परिषद सदस्य, २ पंचायत समिती, १ तालुका अध्यक्ष, १ यूवा मोर्चा अध्यक्ष आणि ५ मंडळ अध्यक्ष शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करणार आहे.

READ ALSO :

हेही वाचा…“रोहित शर्मासह, सुर्यकुमार यादव, जैस्वाल, दुबेंचा सत्कार,” द्वेषाचे राजकारण करणाऱ्यांना आतातरी सुबुद्धी येवो

हेही वाचा…पुण्यात झिका व्हायरसचा धुमाकुळ, श्रीनाथ भिमालेंनी आयुक्तांना लिहिले पत्र 

हेही वाचा…“रोहित शर्मा, विराट कोहलींची मिरवणूक मुंबईच्या बेस्ट बसवरून काढा”, रोहित पवारांची मागणी 

हेही वाचा…कट्टर विरोधक, लोकसभेला साथ दिली, आता विधानसभेचं वेध, कॉंग्रेस जागा सोडणार का ? 

हेही वाचा…“बहिणीला विधानपरिषद मिळाली, आता भावाला देखील राज्यसभा मिळणार” 

Leave a Reply