अकोला : मागील विधानसभेत शरद पवारांनी राजू शेट्टींना आमदार करण्याचा दिलेला शब्द पाळला पाहिजे ही आमची अपेक्षा आहे. असं स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी म्हटलं आहे.5 नोव्हेंबर पर्यंत जर आमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर राज्यातील केंद्रीय मंत्र्यांच्या घरासमोर आंदोलन करू आणि त्यानंतर जर मागण्या पूर्ण नाही झाल्यास पहिले केंद्रीय मंत्री नंतर राज्य मंत्र्यांचे आणि चुकीचे अहवाल देणाऱ्या अधिकाऱ्यांचे कपडे आम्ही फाडु असे वक्तव्य स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी आज अकोल्यात केलो आहे.
रविकांत तुपकर यांनी पत्रकार परिषदेत म्हटलं की, ओला दुष्काळग्रस्त भागात दौरा केलेल्या नेत्यांचे फक्त फोटो सेशन झाले. राज्य सरकारने पावसामुळे झालेल्या नुकसानीसाठी जाहीर केलेलं पेकेज तोकडं असल्याचे ही ते म्हणाले.यावेळी त्यांनी राजू शेट्टी यांना विधानपरिषदेची आमदारकी देण्याबाबत शरद पवार यांना आठवण करून दिली आणि राजू शेट्टी यांना आमदारकी द्यावी अशी अपेक्षा व्यक्त केली.
दरम्यान आज शरद पवार आणि पाकिस्तानच्या नेत्याचे विडिओ शेयर करत मोदींच्या 56 इंची छातीवर तहहयात भावी पंतप्रधान, सर्वच विषयातील तज्ञ, कलियुगातील हरिश्चंद्र म्हणजेच देशातील एकमेव जाणते शरदचंद्र पवारसाहेब यांनी विचारलेल्या कुजकट प्रश्नाला खुद्द पाकिस्ताननेच दिले उत्तर! अशी जहरी टीका आमदार भातखळकर यांनी केली आहे.
Read Also ;
फक्त आरोप करणं किरीट सोमय्यांचं काम, त्यांना भाजपमध्ये कुणी सिरियसली घेत नाही: अनिल परब https://t.co/BYQBcJd5od @advanilparab @KiritSomaiya @ShivSena @bjp4mumbai
— Political महाराष्ट्र (@PoliticalMH) October 30, 2020