IMPIMP
Fadnavis and Thackeray travel in the same lift, will Thackeray join the grand alliance Fadnavis and Thackeray travel in the same lift, will Thackeray join the grand alliance

फडणवीस अन् ठाकरेंचा एकाच लिप्टमधून प्रवास, ठाकरे महायुतीत जाणार का ?

मुंबई : विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला कालपासून सुरूवात झाली. याच दरम्यान काल राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांनी एकाच लिप्टमधून प्रवास केला. याचदरम्यान त्यांच्यात चार ते पाच मिनिटं चर्चाही झाली. त्यानंतर लगेचच मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या कार्यालयात दाखल झाले. त्यावेळी उद्धव ठाकरे देखील उपस्थित होते. यावेळी चंद्रकांत पाटलांनी त्या दोघांनाही चॉकलेट दिले. तर काही वेळ चर्चाही केली. याच दरम्यान आता उद्धव ठाकरे महायुतीत येणार का ? अशी चर्चा सुरू झाली आहे.

हेही वाचा..“चंद्रकांत पाटलांनी आम्हाला चॉकलेट दिले असले तरी जे हलाहल पचवून शिवसेना उभी” 

उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसांच्या कालच्या भेटीची राज्यात सर्वत्र चर्चा झाली. यातच उद्धव ठाकरे पुन्हा महायुती सोबत येणार अशा चर्चा देखील सुरू झाल्या. त्यावर संजय राऊतांनी एका वाक्यात हा विषय संपवून टाकला आहे. आम्ही आमचे हात अपवित्र करून घेणार नाही. कोणत्याही परिस्थितीत भाजपसोबत जाणार नाही. असं संजय राऊतांनी स्पष्ट केलं आहे.

हेही वाचा…लिप्टमध्ये ठाकरे अन् फडणवीसांची काय चर्चा झाली ? प्रत्यक्षदर्शी भुजबळांनी सांगितली खरी हकिकत 

पुढे बोलतांना संजय राऊत म्हणाले की, अनेकदा दिल्लीत पंतप्रधान आणि केंद्रीय गृहमंत्रीही आमच्या लिप्टमध्ये असतात. महाराष्ट्राच्या विधानभवनात व्यवस्था अशी आहे की, एकत्रच लिप्टने प्रवास करायचा असतो. एकाच सभागृहात जायचं असतं. दोन नेते समोरासमोर आले तर नमस्कार करणं हा शिष्टचार असतो. त्या शिष्टचारानुसार एकमेकांनी एकमेकांना नमस्कार केला असेतर तर त्यात राजकीय अर्थ काढण्याची गरज नाही. आम्ही कोणत्याही परिस्थितीत भाजपसोबत पुन्हा हात मिळवणार नाही. आमचे हात अपवित्र करून घेणार नाही. असंही राऊतांनी म्हटले.

READ ALSO :

हेही वाचा..भाजपकडून विधानपरिषदेच्या ०५ जागांसाठी ११ नावांचा विचार..! कुणाला मिळणार संधी ? 

हेही वाचा..भाजपच्या स्थानिक नेत्यांची अजितदादांवर नाराजी, 18 ते 19 आमदार शरद पवारांच्या संपर्कात 

हेही वाचा..“महाराष्ट्राचं राजकारण सहानुभतीवर चालतं, विधानसभेतही चालणार “

हेही वाचा..“तीनवेळा प्रयत्न केला, आता माघार नाही”? रमेश कोंडे भाजपच्या आमदाराची खोची करणार ? 

हेही वाचा..“अजित पवारांनी अन्याय केला का नाही ? “भाजप नेते हर्षवर्धन पाटलांचं मोठं विधान

Leave a Reply