IMPIMP
Fadnavis said that the Congress-Nationalist party had decided to cancel Fadnavis said that the Congress-Nationalist party had decided to cancel

“पैशाची खेळी करता येत नसल्याने काँग्रेस-राष्ट्रवादीने तो निर्णय रद्द ठरविला होता”

मुंबई : मावळत्या सरकारचे जबाबदारी ढकलणारे नाही,  तर उगवत्या सूर्याचे जबाबदारी स्वीकारणारे निर्णय आज राज्य मंत्रिमंडळाने घेतले आहेत, थेट नगराध्यक्ष निवडीत पैशाची खेळी करता येत नाही, हे लक्षात आल्याने काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसने तो निर्णय रद्द ठरविला होता, अशी प्रतिक्रिया राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनेक निर्णयांना मंजूरी देण्यात आली.

“राज्यात कृषीमंत्री नसले तर आम्ही इथे आहोत, मंत्रीमंडळाचा विस्तार नंतर करा” 

औरंगाबाद शहराचे ‘छत्रपती संभाजीनगर‘ असे नामकरण, उस्मानाबाद शहराचे धाराशिव असे नामकरण, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे नाव ‘लोकनेते स्व. दि. बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ‘ आणि एमएमआरडीएला ₹60,000 कोटींचे कर्ज घेण्यास मंजुरी आज मंत्रिमंडळ बैठकीत देण्यात आली. एमएमआरडीएच्या कर्जाला 12,000 कोटी रुपयांची शासकीय हमी देण्याचा निर्णय सुद्धा घेण्यात आला.

“हिंदुत्वासाठी भाजपसोबत गेलेत ना, मग तुम्हाला मंत्रिपद कशासाठी हवंय?”

सारथी, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ, होस्टेल असे अनेक निर्णय आपण घेतले, पण या सर्व निर्णयांचे महविकास आघाडीने वाटोळे केले. आपण मतांसाठी नाही, तर समाजाच्या हितासाठी काम केले पाहिजे. तेच आपल्या कामाचे ब्रीद होते आणि यापुढेही राहील. मराठा आरक्षणाचा आम्ही कायदा केला, तामिळनाडूनंतर उच्च न्यायालयात टिकलेला आपला कायदा होता. यानंतर सर्वोच्च न्यायालयात सुद्धा प्रकरण गेले, तेव्हा कधीही स्थगिती आली नाही. पण महाविकास आघाडीच्या काळात काय झाले, ते सर्वांनाच माहिती आहे. पुढचा मार्ग खडतर आहे,पण आपल्याला पुढे जावेच लागेल. असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

“मावळत्या सरकारची जबाबदारी नाही तर उगवत्या सूर्याची जबाबदारी स्वीकारणारा निर्णय” 

दरम्यान,  औरंगाबाद शहराचं नाव छत्रपती संभाजीनगर असे करण्याचा निर्णय प्रत्येकासाठीच अभिमानाचा आहे. मात्र मागील काळात सरकारने शेतकरी हिताच्या घेतलेल्या निर्णयाला ज्या पद्धताने आपण थांबविले आहे ही पद्धत छत्रपती संभाजी महाराजांना तरी आवडली असती का? असं ट्विट करत मिटकरी यांनी शिंदे सरकारवर निशाणा साधला आहे. मागील सरकारच्या काळात सर्वात जास्त निर्णय नगर विकास खात्यासंदर्भात घेतले गेले. या निर्णयाबाबत आपण जनतेसमोर काहीच बोलत नाहीत.

Read also