माजी मुख्यमंत्री आणि विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस कोरोना पॉझेटिव्ह आदळल्यानंतर कोरोनाच्या सरकारी उपचार केंद्रात, मुंबईतील सेंट जॉर्ज हॉस्पीटलमध्ये उपचार घेत आहेत. कारण, त्यांनी तसे म्हटले होते. शब्द पाळला. फडणवीस यांनी स्वत: ट्विट करून कोरोना पॉझेटिव्ह झाल्याची माहिती दिली होती.
काही दिवसांपूर्वी फडणवीस कोरोनाच्या पाहणी दौऱ्यावर होते. यावेळी, कोरोनाच्या उपचारांबाबत जनतेचा सरकारी यंत्रणेवर विश्वास बसावा म्हणून फडणवीस यांनी महाजन याना फोन करून सांगितले होते की, मला कोरोनाची लागण झाल्यास उपचारासाठी सरकारी रुग्णालयात दाखल करा.
‘गिरीश, मला कोरोना झाला तर मुंबईत सरकारी रुग्णालयात दाखल करा. मला खासगी रुग्णालयात दाखल करू नका,’ असं देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे जवळचे मित्र असलेल्या गिरीश महाजन यांना फोन करून सांगितलं होते. फडणवीस यांचे शब्द ऐकताच महाजन यांच्या अंगावर शहारे आले आणि काय बोलावं हेच त्यांना सुचेनासं झाल्याचं त्यांनी म्हटलं होतं.
माझी कोरोना चाचणी पॉझेटिव्ह आली आहे, असे ट्विट फडणवीस यांनी केल्यानंतर काही नेटीझन्सने फडणवीसांच्या जुन्या वक्तव्याची आठवण करुन देत ते सरकारी रुग्णालयात उपचार घेणार का, असा प्रश्न विचारला होता. फडणवीसांनी त्यांना कृतीने उत्तर दिले.