मुंबई : मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी आज टीव्ही आणि त्या संदर्भातील टीआरपी क्षेत्राबाबतची धक्कादायक माहिती समोर आणली आहे. आयुक्तांनी यावेळी काही टीव्ही चॅनेल टीआरपीसाठी चुकीच्या पद्धतीने सक्रिय होऊन काम करत असल्याची माहिती देत एकच खळबळ उडवून दिली.
चुकीच्या पद्धतीने टीआरपी मिळवण्यासाठी सक्रिय असलेल्या दोन मराठी चॅनेलच्या मालकांना अटक करून खोट्या टीआरपीचे रॅकेट उघड करण्यात मुंबई पोलिसांना यश आलं आहे. त्यासाठी बदनामी करून पैसे देऊन टीआरपीशी छेडछाड करण्यात आली असल्याची माहिती मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी दिली.
रिपब्लिक टेलिव्हिजनचे प्रमोटर्स रॅकेटमध्ये सहभागी असून त्याची चौकशी करण्यात येणार आहे. फक्त मराठी आणि बॉक्स सिनेमा या दोन मराठी चॅनेलच्या मालकांना अटक करण्यात आली आहे.
टीआरपीसाठी घरांमध्ये ५०० रुपयांपासून पैसे देण्यात आले होते. फक्त मराठी बॉक्स सिनेमा आणि रिपब्लिक टीव्ही या तीन प्रमुख चॅनेल आरोपी आहेत.रिपब्लिक टीव्हीच्या पदाधिकाऱ्यांना समन्स बजाविण्यात येणार आहे. सहभागी असाणाऱ्या सर्वांवर अटकेची कारवाई करण्यात येणार आहे. कितीही मोठा आरोपी असला तरी संबंधितांवर कठोर कारवाई करणार असल्याची माहिती सिंग यांनी दिली.
परमबीर सिंह यांनी यामध्ये तीन चॅनलचे नाव असल्याची धक्कादायक माहिती यावेळी दिली. यातील एक नाव काही दिवसांपासून चर्चेत असलेले रिपब्लिक टीव्हीचे देखील असल्याचे यावेळी आयुक्तांनी सांगितले.
काय म्हणालेत नेमकं आयुक्त यावेळी
काही चॅनेल टीआरपीसाठी खोट्या गोष्टी दाखवत आहेत.
गरज पडल्यास रिपब्लिक टीव्हीच्या बँक खात्याची आणि त्यामध्ये आलेल्या पैशांची देखील चौकशी करणार
इंग्रजी चॅनेल येत नसलेल्या ठिकाणी देखील हे चॅनेल दाखवण्यासाठी पैसे दिले जायचे.
चुकीच्या टीआरपीसाठी एक टोळी कार्यरत आहे.
यासंबंधी दोन लोकांना अटक देखील केली आहे.
फक्त मराठी आणि बॉक्स सिनेमाचे चालक अटकेत
Read Also
‘या’ भीतीमुळे भाजपने गुप्तेश्वर पांडे यांना तिकीट नाकारले,अनिल देशमुख यांचा गौप्यस्फोटhttps://t.co/dhpf7YiwoF#GupteshvarPande #anildeshmukh @AnilDeshmukhNCP @ips_gupteshwar #NCP
— Political महाराष्ट्र (@PoliticalMH) October 8, 2020