IMPIMP
Finally, Praful Patel bowed down to the opposition, it was Patel's choice to put a jiratop on Modi Finally, Praful Patel bowed down to the opposition, it was Patel's choice to put a jiratop on Modi

अखेर प्रफुल्ल पटेल विरोधकांसमोर झुकले, मोदींना जिरेटोप घालणं पटेलांच्या आलं अंगलट

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी वाराणसीमधून आपला उमेदवारी अर्ज सादर केला. यावेळी विविध राज्याचे मुख्यमंत्री तसेच केंद्रीय मंत्री उपस्थित होते. मात्र यावेळी अजित पवार गटातील नेते प्रफुल्ल पटेल यांनी मोदींना जिरेटोप घातल्याने मोठा वाद निर्माण झाला आहे. यावरून विरोधकांनी पटेल तसेच भाजपवर जोरदार टिका केली. त्यावर आता प्रफुल्ल पटेल यांनी माफी मागितली आहे.

हेही वाचा..“देशात मोदींची लाट नाही, मग मोदी विरूद्ध राहुल गांधी अशी निवडणूक का केली ?” देवेंद्र फडणवीस म्हणाले…

मोदींना शुभेच्छा देतांना प्रफुल्ल पटेलांनी त्यांच्या डोक्यावर छत्रपती शिवाजी महाराजांची ओळख म्हणून असलेला जिरेटोप घातला. यावरून शरदचंद्र पवार गट राष्ट्रवादी कॉंग्रे, संभाजी ब्रिगेड, तसेच कॉंग्रेसने पटेलांवर जोरदार टिका केली. त्यानंतर भाजप आणि शिंदे गटाकडून यावर स्पष्टीकरण देतांना माफी मागितली आहे. तर प्रफुल्ल पटेलांना यावरून जाहीर माफी मागत यापुढे असं होणार नसल्याचं म्हटलं आहे.

हेही वाचा…“मी एकटा बसतोय, ते तिघं येऊ द्या,” अन् आदित्य ठाकरेंनी दिलं मोठं चॅलेंज 

प्रफुल्ल पटेल यांनी एक्सवर ट्विट केलं आहे. त्यात त्यांनी असं म्हटलं आहे की,  हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे आराध्य दैवत आणि प्रेरणास्थान आहेत. त्यांच्या आदर्शांवर व लोककल्याणाच्या मार्गावर मार्गक्रमण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान होईल, अशी कोणतीही गोष्ट कधी मनातही येऊ शकत नाही. यापुढे काळजी घेऊ.

READ ALSO :

हेही वाचा…मोदींच्या सभेसाठी शरद पवारांचं नाव झाकलं, शरद पवार गटाने मोदींना डिवचलं 

हेही वाचा…“शिंदे, अन् अजितदादांनी कांद्याची माळ घालून मोदींचे स्वागत करावे” 

हेही वाचा…अजित पवार, शिंदे गटाला किती जागा मिळणार ? पृथ्वीराज चव्हाणांनी थेट आकडाच सांगितला 

हेही वाचा…अजित पवारांनी शरद पवारांची साथ का सोडली ? देवेंद्र फडणवीसांनी दिलं ‘हे’ उत्तर 

हेही वाचा..“नवमतदारांचं मत आम्हालाच,’ गुलाबराव पाटलांनी जळगावात ठोकला मोठा दावा