IMPIMP
ambadas danve ambadas danve

“आधी धमकी नंतर दिलगिरी,” अंबादास दानवेंचं सभापतींना पत्र

मुंबई : संसदेत राहुल गांधींनी केलेल्या वक्तव्यावरून राज्याच्या विधान परिषदेच्या सभागृहात विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि भाजप आमदार प्रसाद लाड यांच्यात हमरीतुमरी बघायला मिळाली. यानंतर अंबादास दानवे यांनी प्रसाद लाड यांना शिवी दिल्याने त्यांना पाच दिवसासाठी निलंबित करण्यात आलं. यानंतर आता अंबादास दानवे यांनी विधान परिषदेच्या सभापतींना पत्र लिहून दिलगीरी व्यक्त केली आहे. यातच आज दानवेंच्या निलंबणावर निर्णय घेण्यात येणार आहे.

हेही वाचा..मोदींना संसदेत बोलणंही मुश्किल, हेडफोन लावून भाषण, विरोधकांचा अभुतपूर्व गोंधळ

अंबादास दानवे यांनी सभापतींना पाठवलेल्या पत्रात असं म्हटलं आहे की, मी सभागृहाचा सदस्य म्हणून आतापर्यंत सातत्याने सभागृहाचे पावित्र्य, नियम, प्रथा आणि परंपरा पाळण्याचा आटोकाट प्रयत्न केला आहे. परंतु दिनांक १ जूलै २०२४ रोजी माझ्याकडून अनावधाने घडलेल्या घटनेनंतर आपण मला निलंबित केले. सभापती महोदया, या संदर्भात आमच्या पक्षप्रमुखांनी जाहिरपणे दिलगीरी व्यक्त केली आहे. हे आपण जाणताच आणि माझीही भूमिका सभागृहाचे पावित्र्य कायम राहावे हीच आहे. त्यामुळे सभागृहाचा दिलगिरी व्यक्त करण्याविषयी माझ्या मनात कोणतेही किंतु, परंतु नाही.

हेही वाचा…“राहुल गांधींनी कुठे हिंदुत्वाचा अपमान केला ? ” उद्धव ठाकरेंचा प्रखर सवाल 

सभागृहाचे कामकाज सुरू आहे, या स्थितीत महाराष्ट्रातील शेतकरी, कष्टकरी, तरूण व माता-भगिणीचे अनेक प्रश्न मला सभागृहात मांडायचे आहेत. जेणेकरून सरकार त्या प्रश्नाला न्याय देईल. त्यामुळे माझे निलंबन म्हणजे शेतकरी, कष्टकरी, तरूण व माता भगिणींचे प्रश्न सोडविण्यापासून मला थांबविणे असे होऊ नये. या हेतूने माझ्या निलंबणाचा फेरविचार करावा ही विनंती असं दानवेंनी पत्रात म्हटलं आहे.

दरम्यान, सभागृहात प्रकार घडल्यानंतर देखील बाहेर येऊन अंबादास दानवे यांनी प्रसाद लाड यांच्याविरोधात भाष्य केलं. त्यावर प्रसाद लाड यांनी विधिमंडळाच्या पायऱ्यांवरच आपलं आंदोलन सुरू केलं होतं. त्यानंतर भाजप आणि महायुतीच्या नेत्यांनी अंबादास दानवे यांच्यावर जोरदार टिकास्त्र सोडलं होतं.

READ ALSO :

हेही वाचा..अमोल कोल्हेंना शरद पवार गटाकडून मोठं गिप्ट, पक्षाने दिली मोठी जबाबदारी 

हेही वाचा..”राज्यसभेवर खासदार होण्याचा शब्द दिलाय, विधानसभा लढवणार नाही”, जानकरांनी स्पष्टच सांगितले 

हेही वाचा..राष्ट्रवादीचा अजून एक शिलेदार अजित पवारांना धक्का देणार ? शरद पवार गटात जाणार का ?

हेही वाचा..इच्छूक उमेदवाराकडून पंढरपुर दर्शनाचा आटापिटा पडला महागात, खेड आळंदीत २१ जण गंभीर जखमी

हेही वाचा..“मी एकनाथ शिंदेंची लाडकी बहिण “, विधान परिषदेची उमेदवारी मिळाल्याने भावना गवळींची प्रतिक्रिया

Leave a Reply