दिल्ली : मध्य प्रदेशातील महिला व बालविकास मंत्री ईमरतीदेवींवर अतिशय वादग्रस्त व आक्षेपार्ह भाषा वापरल्याबद्दल मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांच्यावर कारवाई करत भारतीय निवडणूक आयोगाने त्यांचा ‘स्टार प्रचारका’चा दर्जा काढून घेतला होता आता त्याच निर्णयाला रद्द ठरवत सर्वोच्च न्यायालयाने आज त्यांचा तो दर्जा कायम ठेवत माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांना दिलासा दिला आहे.
सोमवारी सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीत सरन्यायाधीश शरद बोबडे, न्यायमूर्ती ए. एस. बोपन्ना आणि न्यायमूर्ती वी. रामासुब्रमण्यम यांच्या खंडपीठाने निवडणूक आयोगाचा निर्णय रद्दबातल केला आहे. निवडणूक आयोगाने आपल्या वैधानिक अधिकारांचं उल्लंघन केल्याचं माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी म्हटलं होतं, तर निवडणूक आयोगाला एखाद्या स्टार प्रचारकाचा दर्जा काढून घेण्याचा अधिकार कुणी दिला? असा सवाल सरन्यायाधीश शरद बोबडे यांनी उपस्थित केला आहे.
Supreme Court stays Election Commission's revocation of Congress leader Kamal Nath's star campaigner status. pic.twitter.com/h8z0h34nWH
— ANI (@ANI) November 2, 2020
नेमकी कारवाई का?
आदर्श आचारसंहितेचं उल्लंघन केल्याप्रकरणी निवडणूक आयोगाने माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांना शिक्षा देताना तो दर्जा काढून घेतला होता. त्यानंतर कमलनाथ हे मध्य प्रदेशातील उर्वरित निवडणुकीत प्रचारसभेत प्रचार करु शकत नव्हते. आणि जर त्यांनी प्रचार केलाच तर त्याचा सर्व खर्च संबंधित उमेदवारांकडून निवडणूक आयोग घेणार होते. पण हा निर्णय आता सर्वोच्च न्यायालयाने रद्द ठरवल्यावर माजी मुख्यमंत्री कमलनाथांना मोठा दिलासा मिळाल्याचं मानलं जात आहे.
Read Also :
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे ‘राज्यपाल नियुक्त आमदारां’ची यादी स्विकारणारच नाही- मंत्री हसन मुश्रीफांचा गौप्यस्फोट https://t.co/MUIRPcxqon @mrhasanmushrif @CMOMaharashtra @BSKoshyari
— Political महाराष्ट्र (@PoliticalMH) November 2, 2020