पिंपरी : मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजप-राष्ट्रवादी- मनसे- आरपीआय- रासप- मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांच्या प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजितदादा पवार, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, नामवंत अभिनेता गोविंदा या मान्यवरांच्या सभा व रोड शो होणार आहेत, अशी माहिती शिवसेनेचे जिल्हाप्रमुख बाळासाहेब वाल्हेकर यांनी दिली.
हेही वाचा…“हाच मुद्दा सरकारने हिरावून घेतल्याने कोल्हेंना पोटशूळ उठला”, आढळरावांनी कोल्हेंना झोडपले
रविवारी (5 मे ) संध्याकाळी पाच वाजता लोकप्रिय अभिनेता गोविंदा यांच्या हस्ते महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या मध्यवर्ती निवडणूक कार्यालयाचे उद्घाटन होणार आहे. पिंपरी येथे डॉ. आंबेडकर पुतळ्याच्या मागे हे निवडणूक कार्यालय सुरू करण्यात आले आहे. उद्घाटन समारंभानंतर पिंपरी कॅम्प, पिंपरीगाव भागात गोविंदा यांचा रोड शो होईल.
हेही वाचा…“कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीला किती जागा मिळणार” ? शरद पवारांनी थेट आकडाच सांगितला
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सोमवारी (6 मे ) पिंपरी-चिंचवडमध्ये रहाटणी येथे तर पनवेल मध्ये खारघर येथे प्रचार सभा घेणार आहेत. रहाटणी येथील कापसे लॉन्स येथे दुपारी दोन वाजता तर खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलच्या मैदानावर पाच वाजता त्यांची सभा होणार आहे.
केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी हे मंगळवारी (7 मे ) संध्याकाळी सहा वाजता कर्जत तालुक्यातील चौक फाटा मैदानावर जाहीर सभा घेणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष व उपमुख्यमंत्री अजित पवार हे गुरुवारी (9 मे ) पिंपरी-चिंचवडमध्ये एक सभा मावळ विधानसभा मतदारसंघात एक सभा घेणार आहेत. निवडणुकीच्या प्रचाराची सांगता शनिवारी (11 में ) पिंपरी-चिंचवडमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या रोड शोने होईल. त्यानिमित्त महायुतीच्या वतीने जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात येणार आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“बोलतात जास्त अन् बापाच्या जीवावर मत मागतात”, महादेव जानकरांचा निंबाळकरांना टोला
हेही वाचा….“त्यामुळे सुनेत्रा पवारांचा प्रचार करणं माझं कर्तव्य”, महादेव जानकर आता बारामतीत तळ ठोकून
हेही वाचा…आढळरावांसाठी मनसैनिकांची फौज मैदानात, शिरूरमध्ये घडतंय काय ?