पुणे : राज्यात लोकसभा निवडणुकीसाठी आता तिसऱ्या चौथ्या आणि पाचव्या टप्प्यातील मतदान शिल्लक राहिलं आहे. येत्या ७ मे, १३ मे आणि २० मे रोजी महाराष्ट्रात काही मतदारसंघात मतदान होणार आहे. अशातच आता निवडणुक प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात राज्यातील सर्वच राजकीय नेत्यांनी आपलं राजकीय शस्त्रे बाहेर काढली आहेत. अशातच राज्यात कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीला किती जागा मिळणार ? यावर शरद पवारांनी मोठं भाष्य केलं आहे.
लोकसभा निवडणुकीचा निकाल येत्या ०४ जून रोजी लागणार आहे. त्याआधी राज्यात राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसला किती जागा मिळणार? याच थेट आकडाच शरद पवारांनी सांगितला आहे. शरद पवार म्हणाले की, राज्यात सध्या परिवर्तन होतांना दिसत आहे. पाच वर्षापुर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेसला १ राष्ट्रवादी कॉंग्रेसला पाच आणि छत्रपती संभाजीमध्ये एमआयएमला एका जागेवर विजय मिळाला होता. पण यावेळेस मला वाटते की, कॉंग्रेसला किमान १० ते १२ जागांवर विजय मिळेल. आम्हाला ८ ते ९ जागांवर विजय मिळेल. तर गेल्या निवडणुकीच्या तुलनेत यंदाच्या चित्रात प्रचंड फरक असल्याचेही शरद पवारांनी सांगितले.
हेही वाचा…“तर त्यांची ऐशी की तैशी करुन टाकली असती”, तटकरेंनी दिला सुचक इशारा
पुढे बोलतांना शरद पवार म्हणाले की, भाजपने जो ४०० पारचा आकडा दिला आहे. तो आकडा खाली जाणार आहे. देशाचा पंतप्रधान कितीवेळा महाराष्ट्रात येतोय. यापुर्वी आम्ही कोणत्याही पंतप्रधानाला इतक्या वेळा महाराष्ट्रात येताना पाहिले नव्हते. मोदींचा हा तिसरा-चौथा राऊंड आहे. यावरून एक गोष्ट स्पष्ट आहे की, त्यांना विजयाबद्दल कॉन्फिडन्स नाही. त्यामुळे मोदींना पुन्हा पुन्हा राज्यात यावे लागत असल्याचेही ते म्हणाले.
दरम्यान, महाविकास आघाडीत कॉंग्रेसच्या वाट्याला एकूण १७ जागा आल्या आहेत. तर शरद पवार गटाने १० जागांवर आपले उमेदवार उभे केले आहेत. तर २१ जागा या ठाकरे गटाला मिळाल्या आहेत. त्यामुळे येत्या ०४ जून रोजी राज्यात काय निकाल लागणार ? ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“निकालावेळी अनंत गीते तिसऱ्या राउंडला बाहेर जाताना दिसले पाहिजे”, तटकरेंनी पुन्हा डिवचलं
हेही वाचा…पुण्यात ‘एमआयएम’ शक्तीप्रदर्शन करणार, कुणाला बसणार फटका ?
हेही वाचा…“मला घड्याळ्यापेक्षा तुतारी जास्त आवडली, तुतारी तु तू करत वाजली की अख्खा महाराष्ट्र गरजतो”
हेही वाचा…“शहरी पूर नियंत्रण आराखडा राबविणार”, मुरलीधर मोहोळांनी पुणेकरांना दिलं आश्वासन