पुणे : लोकसभा निवडणुकीसाठी प्रचार करण्यासाठी आता काहीच दिवस शिल्लक राहिले आहेत. अशातच प्रचाराच्या तोफा थंडावत असतांना अनेक राजकीय नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करतांना दिसत आहेत. अशातच शिरूरमध्ये खासदार शरद पवार गटाचे ‘अमोल कोल्हे भाजपचे कमळ हाती घेऊन, लोकसभा निवडणुकीत उभं राहायला इच्छुक होते’, असा गौप्यस्फोट भाजपचे आमदार प्रवीण दरेकर यांनी केला आहे. प्रवीण दरेकरांनी केलेल्या वक्तव्यावरुन आता राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
हेही वाचा…“माझ्यावर टिका केल्याशिवाय मोदींना झोप येत नाही”, शरद पवारांचा मोदींना खोचक टोला
“हा आरोप करताना शिरूर लोकसभेत अमोल कोल्हेच्या नाटकाचा शेवटचा प्रयोग आहे. पाच वर्षे कोल्हेंनी राजकीय नाटकं केली, आता त्यांनी त्यांचा धंदा पाहावा. शिरूर लोकसभेत महायुतीचे उमेदवार शिवाजी आढळरावांच्या प्रचारासाठी प्रवीण दरेकर शिरुर येथे आले होते”, असे प्रवीण दरेकर म्हणाले आहेत. दरेकरांच्या या आरोपानंतर अमोल कोल्हे यांनी आक्षेप घेतला आहे.
हेही वाचा…अखिल भारतीय मराठा महासंघाचा मुरलीधर मोहोळ यांना पाठींबा
‘प्रवीण दरेकरांकडे इतकी चांगली विनोद बुद्धी आहे. याची मला कल्पना नव्हती. मात्र त्यांच्या या वक्तव्यानं मी स्वच्छ प्रतिमेचा आहे, याचे सर्टिफिकेट दरेकरांनी दिले. आजकाल लोकांमध्ये अशी चर्चा आहे की, भ्रष्टाचाऱ्यांचा एकच नारा, तुरुंगापेक्षा भाजप बरा, असा एक नारा दिला जातो’, असे अमोल कोल्हे म्हणाले आहेत.
READ ALSO :
हेही वाचा…पुण्यात ‘एमआयएम’ शक्तीप्रदर्शन करणार, कुणाला बसणार फटका ?
हेही वाचा…“मला घड्याळ्यापेक्षा तुतारी जास्त आवडली, तुतारी तु तू करत वाजली की अख्खा महाराष्ट्र गरजतो”
हेही वाचा…“शहरी पूर नियंत्रण आराखडा राबविणार”, मुरलीधर मोहोळांनी पुणेकरांना दिलं आश्वासन
हेही वाचा…“तर त्यांची ऐशी की तैशी करुन टाकली असती”, तटकरेंनी दिला सुचक इशारा