चाकण : शिरूर लोकसभा मतदारसंघात सध्या प्रचाराला चांगलीच वेग घेतला आहे. या मतदारसंघात वैयक्तिक आरोप – प्रत्यारोपांच्या फैरी झडताना दिसत आहेत. अशातच खासदारकीचा मधूनच राजीनामा द्यायची घाईपण आणि निवडणूक आल्यावर ती लढविण्याची हौसपण आणि आता निवडणुकीसाठी बाळसंही आलं, असं वागून मतदारांना गृहीत धरण्याचा प्रकार डॉ. अमोल कोल्हेंकडून सुरू आहे. आता मतदार त्यांना धडा शिकवतील, असे म्हणत महायुतीचे शिरूरचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी विद्यमान खासदार अमोल कोल्हे यांच्यावर जोरदार घणाघात चढवला. ते चाकण येथे बोलत होते.
हेही वाचा…“मला घड्याळ्यापेक्षा तुतारी जास्त आवडली, तुतारी तु तू करत वाजली की अख्खा महाराष्ट्र गरजतो”
शिरूर लोकसभेसाठी मनसेच्या वतीने चाकणच्या आंबेठाण चौकात मेळावा झाला. या वेळी आमदार दिलीप मोहिते पाटील, मनसे नेते राजेंद्र बाबू वागस्कर, शिवसेना उपनेते इरफान सय्यद, भाजपचे जिल्हाध्यक्ष शरद बुट्टे पाटील, मनसे जिल्हाध्यक्ष समीर थिगळे, जिल्हाध्यक्ष मकरंद पाटे, सरचिटणीस अजय शिंदे, प्रदेश उपाध्यक्ष युवा मोर्चा प्रिया पवार, राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष कैलास सांडभोर, भाजपचे तालुकाध्यक्ष शांताराम भोसले, राष्ट्रवादी युवकचे तालुकाध्यक्ष जयसिंग दरेकर, सभापती कैलास लिभोरे, पुणे जिल्हाध्यक्ष रामदास दरेकर, सचिन चिखले, संदीप पवार, मनोज पडवळ आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
हेही वाचा…“शहरी पूर नियंत्रण आराखडा राबविणार”, मुरलीधर मोहोळांनी पुणेकरांना दिलं आश्वासन
दरम्यान, मनसैनिक शिरूर लोकसभेत तन-मन-धनाने जिवाचं रान करून आढळरावांसाठी मतदान करून घेण्यासाठी लोकांमध्ये प्रचार करत आहेत. पिंपरीसाठी माजी नगरसेवक सचिन चिखले, हडपसरमध्ये साईनाथ बाबर, हवेलीची धुरा किरण माने, चेतन चौधरी, शिरूरची धुरा रवी मुरादे, नाना लांडे, किरण गव्हाणे, आंबेगावची धुरा बाबू बाणखेले, आशिष शिंदे, किरण गव्हाणे, खेडची धुरा मंगेश सावंत, सनी लोणकर, नवनाथ लोखंडे सांभाळत आहेत. विद्यार्थी सेनेचा ३०० मनसैनिकांचा मेळावा खेड तालुक्यात झाला आहे. शिरूर, हवेली, जुन्नर, आंबेगाव, खेड-आळंदी या सर्वच भागातले मनसैनिक आढळरावांच्या प्रचारासाठी तळागाळातल्या मतदारांपर्यंत पोहोचत आहेत, अशी माहिती विद्यानंद मानकर यांनी दिली.
READ ALSO :
हेही वाचा…“हाच मुद्दा सरकारने हिरावून घेतल्याने कोल्हेंना पोटशूळ उठला”, आढळरावांनी कोल्हेंना झोडपले
हेही वाचा…“कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीला किती जागा मिळणार” ? शरद पवारांनी थेट आकडाच सांगितला
हेही वाचा…“निकालावेळी अनंत गीते तिसऱ्या राउंडला बाहेर जाताना दिसले पाहिजे”, तटकरेंनी पुन्हा डिवचलं
हेही वाचा…पुण्यात ‘एमआयएम’ शक्तीप्रदर्शन करणार, कुणाला बसणार फटका ?