कोल्हापुर : कॉंग्रेसचे दिवंगत नेते आणि माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे खंदे समर्थक म्हणून ओळख असलेले करवीर विधानसभा मतदारसंघाचे आमदार पी. एन. पाटील यांचं दुखद निधन झालं आहे. वयाच्या ७१ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. यातच गांधी घराण्याचे अत्यंत विश्वासून अशी त्यांची ओळख होती. याबाबत कॉंग्रेसचे नेते आणि विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी याबाबत भावपुर्ण श्रंद्धाजली वाहिली आहे.
हेही वाचा..“आपले अधिकार उध्वस्त झाल्याशिवाय हे गृहस्थ स्वस्थ बसणार नाहीत”, शरद पवारांचा मोदींना टोला
पी.एन. पाटील रविवारी राहत्या घरातल्या बाथरूममध्ये पाय घसरून पडले. यादरम्यान त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यानंतर पाटील यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु उपचारांदरम्यानच त्यांची प्राणज्योत मालवली आहे.
हेही वाचा..संजय काकडेंनी घेतला अटक वॉरंटचा धसका, तक्रारदाराला बोलवून सुपूर्द केला धनादेश
तर कोल्हापूर जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाचे आधारवड, विधिमंडळातील माझे सहकारी आमदार पी एन पाटील यांच्या निधनाने वृत्त अत्यंत दुःखद आहे. त्यांच्या निधनाने काँग्रेस पक्षाचे आक्रमक आणि निष्ठावान नेतृत्व आज आम्ही गमावले आहे. श्री.पी एन पाटील यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. या दुःखातून सावरण्यासाठी त्यांच्या कुटुंबाला आणि मित्र परिवाराला बळ मिळो हीच ईश्वचरणी प्रार्थना. असं वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे.
READ ALSO :
हेही वाचा…‘नाईट लाईफ संस्कृतीच्या अशा प्रकाराला आळा घाला”, लहू बालवडकर यांची मोठी मागणी
हेही वाचा..ठाकरे अन् केजरीवाल यांच्या भाषणानंतर मुंबईचं वारं फिरलं
हेही वाचा..“रोहित पवारांनी थेट व्हिडीओच आणले,” पंकजा मुंडेंनी दिलं प्रत्युत्तर म्हणाले…
हेही वाचा..“भाजपकडून मुंबईत कोट्यवधी रूपये लोकांना वाटले”, दानवेंचा खळबळजनक आरोप