पुणे : पुण्यातील कल्याणीनगर येथे झालेल्या अपघातानंतर आता बेकायदेशीर चालविल्या जाणाऱ्या रूफटॉफ आणि साईड मार्जिनमधील रेस्टॉरंट, बार आणि पबच्या विरोधात महापालिकेच्या बांधकाम विभागाने हातोडा चालविण्यास सुरूवात केली आहे. शुक्रवारी एकाच दिवसात मुंढवा, कोरेगाव पार्क, कल्याणीनगर घोरपडी, पुणे स्टेशन आणि विमाननगर परिसरात स्वतंत्र तयार करून मुंढवा भागातील हॉटेल, पर आदींचे अनधिकृत शेड काढण्यात आले. यावर आता पुण्यात राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या फैऱ्या सुरू झाल्या आहेत.
हेही वाचा..“रोहित पवारांनी थेट व्हिडीओच आणले,” पंकजा मुंडेंनी दिलं प्रत्युत्तर म्हणाले…
पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी अनधिकृत पबवर कारवाई कारवाई असं ट्विट केलं. त्यात पोलीस आयुक्यांच्या भेटीत केलेल्या मागणीनुसार पुणे शहारात असणाऱ्या पब्जवर कारवाी सुरू करण्यात आली असून या कारवाईचं स्वागत असं म्हटलं आहे. त्यावर भाजप आमदार राम सातपुते यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना डिवचलं आहे.
हेही वाचा..“भाजपकडून मुंबईत कोट्यवधी रूपये लोकांना वाटले”, दानवेंचा खळबळजनक आरोप
अनिल देशमुख यांचं नाव घेऊन याला गृहखाते सांभाळणं म्हणतात. तुम्ही जर गृहमंत्री असतात तर पहिल्यांदा तुमच्या लाडक्या वाझेला वसुलीला पाठवलं असतं. या पब मालकांकडे, असही राम सातपुते यांनी म्हटलंय. त्यावर शरद पवार गटाचे पुणे शहाराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी ट्विट करून पलटवार केलाय. रामभाऊ बीडवाले हे अनधिकृत पब सुरू असताना तुमचा सागर बंगल्यावरचा बॉस, महापौर बंगल्यातील महापौर अन् १०० प्लस नगरसेवक झोपले होते का ? असा खोचक सवालही त्यांनी केलंय. तसेच दोन निष्पाप बळी जाण्याची वाट बघत होते ? अनधिकृत पब बंद करणं हे काय पबजी खेळण्यासारखं आहे का ? असा सवालही त्यांनी केलाय.
रामभाऊ बीडवाले… हे अनधिकृत पब सुरू असताना तुमचा सागर बंगल्यावरचा बॉस, महापौर बंगल्यातील महापौर अन् १००+ नगरसेवक झोपले होते का ?
की दोन निष्पाप बळी जाण्याची वाट बघत होते ?
अनधिकृत पब बंद करणं हे काय पबजी खेळण्यासारखं आहे का ? https://t.co/AmVWFhifdA— Prashant Sudamrao Jagtap (@JagtapSpeaks) May 22, 2024
READ ALSO :
हेही वाचा…वायकर जिंकले काय अन् हरले काय ? माझा काय दोष ? गजानन किर्तीकरांच्या विधानाने खळबळ
हेही वाचा…बाथरूममध्ये पाय घसरून कॉंग्रेस आमदाराचा मृत्यू, कोल्हापुरात एकच खळबळ
हेही वाचा…‘नाईट लाईफ संस्कृतीच्या अशा प्रकाराला आळा घाला”, लहू बालवडकर यांची मोठी मागणी
हेही वाचा..ठाकरे अन् केजरीवाल यांच्या भाषणानंतर मुंबईचं वारं फिरलं