सातारा : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज महायुतीचे उमेदवार उदयनराजे भोसले यांच्यासाठी साताऱ्यात प्रचार सभा घेतली. यावेळी अजित पवारांनी आमदार मकरंद पाटील यांचे बंधू नितीन पाटील यांना मी जूनमध्ये खासदार करणार असल्याची घोषणा केली. त्यामुळे याची राजकारणात एकच चर्चा सुरू झाली आहे.
हेही वाचा…“कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीला किती जागा मिळणार” ? शरद पवारांनी थेट आकडाच सांगितला
यंदाच्या निवडणुकीत महायुतीच्या उमेदवारा वाई-महाबळाश्वर-खंडाळा या भागातून एक लाखांचं मताधिक्य द्या. जूनमध्ये मी नितीन पाटील यांना खासदार करतो. त्यांना खासदार नाही केलं तर मी पवारांची औलाद सांगणार नाही. असेही अजितदादा म्हणाले.
पुढे बोलतांना ते म्हणाले की, सातारा जिल्हा हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला मानला जातो. राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर सातारा जिल्ह्याने पक्षाला भरभरून प्रेम दिलं आहे. मात्र राष्ट्रवादीत दोन गट पडल्यानंतर होत असलेली ही पहिलीच निवडणूक आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी साताऱ्यातून आपला निष्ठावंत शिलेदार शशिकांत शिंदे यांना मैदानात उतरवलं आहे.
हेही वाचा…“निकालावेळी अनंत गीते तिसऱ्या राउंडला बाहेर जाताना दिसले पाहिजे”, तटकरेंनी पुन्हा डिवचलं
राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून या जिल्ह्यात तुम्ही राष्ट्रवादीच्या घड्याळ चिन्हाचा खासदार निवडून देत आहात. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत वेगळं बटण दाबताना तुमच्या मनात वेगळी भावना येईल. पण तुम्ही काही चिंता करू नका. आता तुम्ही चांगलं मतदान करून महायुतीच्या उमेदवारा निवडून द्या. असेही आवाहनही अजित पवारांनी केले.
READ ALSO :
हेही वाचा…“बोलतात जास्त अन् बापाच्या जीवावर मत मागतात”, महादेव जानकरांचा निंबाळकरांना टोला
हेही वाचा….“त्यामुळे सुनेत्रा पवारांचा प्रचार करणं माझं कर्तव्य”, महादेव जानकर आता बारामतीत तळ ठोकून
हेही वाचा…आढळरावांसाठी मनसैनिकांची फौज मैदानात, शिरूरमध्ये घडतंय काय ?
हेही वाचा…“हाच मुद्दा सरकारने हिरावून घेतल्याने कोल्हेंना पोटशूळ उठला”, आढळरावांनी कोल्हेंना झोडपले