धाराशिव : धाराशिव लोकसभा निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्पात आला असून याठिकाणी आता जोरदार आरोप-प्रत्यारोप होतांना दिसत आहे. धाराशिवच्या विकासासाठी निधी द्यायचा सोडा. हा अनेकांच्या लग्नात जातो, जेवण करतो, फोटो काढतो, पण एक रूपयाचा आहेर देखील कधी कुणाला दिलेला नाही. अशा शब्दात शिवसेना शिंदे गटाचे नेते अॅड. धनंजय धाबेकर यांनी विद्यमान खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यावर जोरदार टिका केलीय. धाराशिव लोकसभा मतदारसंघाच्या महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटील यांच्या प्रचार सभेत ॲड. धनंजय धाबेकर बोलत होते.
ॲड.धनंजय धाबेकर म्हणाले की, इतर लग्नांच सोडा, पण बाप मेल्यानंतर वर्षभरात कराव्या लागणाऱ्या कित्तेक लग्नात याने हजेरी लावली. पण कधी त्यांना मदत म्हणून एक रुपयांचा देखील आहेर केला नाही. तो काय आपल्यासाठी निधी आणणार. असा खोचक सवाल करत गेल्या 20 वर्षांपासून ते राजकारणात आहेत. आम्हीच त्यांचा प्रचार केला. मात्र सांगण्यासारखे एकही काम त्यांनी केलेलं नाही. असा घणाघात देखील त्यांनी चढवला.
हेही वाचा…पुण्यात ‘एमआयएम’ शक्तीप्रदर्शन करणार, कुणाला बसणार फटका ?
पुढे बोलतांना ते म्हणाले की, नेहमी दुसऱ्यांना बदनाम करण्याचे राजकारण ओमराजे निंबाळकर यांनी केले आहे. केवळ कर्मचारी, अधिकाऱ्यांना शिव्या घालून काम करून घ्यायचा हा त्यांचा धंदा आहे. त्याच कर्मचाऱ्यांचा भ्रष्ट म्हणून ते उल्लेख करतात. सर्व नोकरदारांनी अधिकाऱ्यांना मिळत असलेल्या या वागणुकीचा मतदान करण्यापूर्वी विचार केला पाहिजे. असे आवाहन देखील त्यांनी यावेळी मतदारांना केले.
काही दिवसांपूर्वी ओमराजे निंबाळकर म्हणाले होते, कारखाना भंगार होता तर तुम्ही विकत का घेतला? पण आता जेव्हा त्या कारखान्याबाहेर ऊसाचे ट्रक लागताना त्यांना दिसत असतील, तेव्हा डॉ. तानाजी सावंतांनी हा कारखाना का घेतला? हे कळत असेल. जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून आपल्या भागातील उसाला भाव मिळाला पाहिजे. या भागातील कामगारांच्या हाताला रोजगार दिला पाहिजे, या भावनेतून सावंत यांनी हा कारखाना घेतला असल्याचे धाबेकर म्हणाले.
READ ALSO :
हेही वाचा….“त्यामुळे सुनेत्रा पवारांचा प्रचार करणं माझं कर्तव्य”, महादेव जानकर आता बारामतीत तळ ठोकून
हेही वाचा…आढळरावांसाठी मनसैनिकांची फौज मैदानात, शिरूरमध्ये घडतंय काय ?
हेही वाचा…“हाच मुद्दा सरकारने हिरावून घेतल्याने कोल्हेंना पोटशूळ उठला”, आढळरावांनी कोल्हेंना झोडपले
हेही वाचा…“कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीला किती जागा मिळणार” ? शरद पवारांनी थेट आकडाच सांगितला
हेही वाचा…“निकालावेळी अनंत गीते तिसऱ्या राउंडला बाहेर जाताना दिसले पाहिजे”, तटकरेंनी पुन्हा डिवचलं