अहमदनगर : नगरमध्ये सावेडी येथे आज शहर भाजपने पंडित दीनदयाळ उपाध्याय जयंतीनिमित्त वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाला माजी मंत्री विनोद तावडे यांच्यासह प्रा.राम शिंदे एकाच व्यासपीठावर एकत्र आल्याचे पहायला मिळाले. यावेळी बोलताना मंत्र्यांनी चांगलीच शाब्दिक फटकेबाजी केल्याचे पहायला मिळले.
आयोजित कार्यक्रमात माजी मंत्री प्रा. राम शिंदे यांनी बोलणे टाळले. शिंदे यांचा घसा दुखत असल्यामुळे ते बोलणार नसल्याचे भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष भैय्या गंधे यांनी यावेळी सांगितले. त्यानंतर मात्र माजी मंत्री विनोद तावडे यांनी हाच धागा पकडत आपल्या भाषणात चांगलीच फटकेबाजी केली. ‘शिंदे यांचा घसा दुखतोय म्हणून ते बोलणार नाहीत, असे जेव्हा सांगितले तेव्हा मी घाबरलोच. कारण करोनाचे एक लक्षण घसा दुखणे आहे,’ असे ते म्हणाले आणि एकच हास्यकल्लोळ झाला.
प्रांत संघचालकांचे मानले आभार
शहर भाजपच्या कार्यक्रमाला प्रांत संघचालक नानासाहेब जाधव उपस्थित राहिल्याने त्यांचे माजी मंत्री विनोद तावडे यांनी विशेष आभार मानले. ते म्हणाले, ‘भाजपच्या मंचावर कोणतेही संघचालक येत नाहीत. पण दीनदयाळ यांची आज जयंती आहे, व त्यांच्या एकात्म, मानवता या विचारांच्या मार्गाने संघ परिवार जातो. त्यामुळे आजच्या कार्यक्रमाला नानासाहेब आले, याचा मनापासून आमच्या सर्वांनाच आनंद झाला आहे.
यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रांत संघचालक नानासाहेब जाधव, महापौर बाबासाहेब वाकळे, उपमहापौर मालन ढोणे, शहर जिल्हाध्यक्ष भैय्या गंधे, माजी खासदार दिलीप गांधी, माजी आमदार चंद्रशेखर कदम, प्रदेश कार्यकारिणी सदस्य प्रा.भानुदास बेरड, अभय आगरकर आदी उपस्थित होते.
Read Also
… म्हणून काँग्रेस – राष्ट्रवादी ठाकरे सरकार पडू देत नाही,माजी मंत्र्याने केला खुलासाhttps://t.co/UK01EBzgxP#thackaresarkar #mahavikasaaghadi #bjp @RamShindeMLA
— Political महाराष्ट्र (@PoliticalMH) September 25, 2020