मुंबई: राज्यात मराठा आरक्षणानावरुन राजकारण होता आहे. कोल्हापूर येथे संभाजीरांजे यांच्या नेतृत्वात मराठा मुक मोर्चा काढण्यात आला होता. यामध्ये मराठ आरक्षण व मराठा समाजाला आरक्षण मिळे पर्यंत काही योजनाची मागणी राज्य सरकारला करण्यात आली होती. मराठा समाजासाठीच्या योजनांसाठी निधीची अडचण येऊ देणार नाही’ असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार दिला आहे.
सारथी संस्थेच्या योजनांसाठी निधीची कुठलीही अडचण येऊ देणार नाही. सारथी संस्थेने गरीब, गरजू नागरिकांच्या पर्यंत योजना पोचवून त्या लाभार्थ्यांची संख्या वाढवावी. तसेच आरक्षणाच्या निकालामुळे विविध शासकीय नोकऱ्यांमध्ये नियुक्तीच्या प्रतिक्षेत असलेल्या मराठा समाजातील तरुणांना नियुक्ती देताना आर्थिक भार सोसण्यास शासन तयार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे.
खासदार मा. संभाजीराजे छत्रपती यांच्या नेतृत्वाखालील मराठा समाजाचे शिष्टमंडळ व सारथी संस्थेचे संचालक मंडळ यांच्यासोबत बैठक पार पडली. त्यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संभाजीराजे यांना आश्वासन दिले आहे.
यावेळी छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास (सारथी) संस्थेला गरीब, गरजू मराठा तरुणांना प्रशिक्षण व विकास योजनांचा लाभ देण्यासाठी आवश्यक निधी देण्यासह सारथी संस्थेला स्वायत्तता देण्याची घोषणा बैठकीत करण्यात आली आहे. सारथी संस्थेचं सबलीकरण व विविध उपक्रमासाठी आवश्यक निधी देण्यात येणार आहे. सारथी संस्थेचे आठ विभागीय कार्यालये व एक उपकेंद्र सुरु करण्यात येणार आहे. पहिलं उपकेंद्र कोल्हापूर येथे पुढील महिन्यापासूनच सुरु करण्याचा प्रयत्न आहे. राज्यातील शैक्षणिकदृष्ट्या महत्त्वाच्या शहरात सारथीमार्फत मराठा समाजाच्या विद्यार्थी, विद्यार्थीनींसाठी वसतिगृह सुरु करण्यात येणार आहे. सारथी संस्थेमार्फत प्रशिक्षण घेतलेल्या तरुणांना अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळामार्फत सुरु असलेल्या व्याज परतावा योजनेत प्राधान्य दिले जाईल.
तसेच सारथी संस्थेचे बंद असलेले उपक्रम शासन मान्यतेसाठी प्रलंबित आहेत; त्यांना मान्यता घेऊन ते सुरु करण्यात येतील. ही संस्था नियोजन विभागाच्या अंतर्गत असल्यानं प्रत्येक जिल्ह्याच्या नियोजन भवनात सारथींच्या प्रतिनिधींसाठी जागा देण्यात येईल. तारादूत प्रकल्पही सुरू होईल. शासनस्तरावर मराठा समाजाच्या तरुणांचे शैक्षणिक व नोकरीसंदर्भात असलेले प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न केले जातील. सारथी संस्थेनं दिलेल्या स्वायत्तेचा लाभ घेऊन आर्थिकदृष्ट्या गरीब मराठा समाजातील तरुणांच्या विकासासाठी प्रयत्न करावेत. गरीब गरजू मराठा तरुणांना रोजगारभिमुख प्रशिक्षण देण्यासाठी सारथी संस्थेनं त्याप्रमाणे प्रशिक्षण अभ्यासक्रम सुरु करण्याचे निर्देश दिले.
खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी यावेळी सारथी संस्थेला निधी देणे, मराठा तरुणांच्या नियुक्त्या, इतर मागासवर्गाप्रमाणे सवलती देणे, अण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळात संचालक मंडळ नेमणे, विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह व निर्वाह भत्ता योजनेची अमंलबजावणी, सारथी संस्थेने छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर काढलेल्या पुस्तकाचे प्रकाशन करणे, कोपर्डीचा खटला जलद गतीने चालविणे व आंदोलनात मृत्यूमुखी पडलेल्यांच्या वारसांना शासकीय नोकरी आदी मागण्या मांडल्या होत्या. संभाजीराजे छत्रपती म्हणाले की, समाजाच्या मागण्यांवर राज्य शासन सकारात्मक आहे. या मागण्यांची अंमलबजावणी करण्यात यावी. तसेच सारथी संस्थेला अधिक निधी देण्यात यावा.