उत्तर प्रदेशातील कुख्यात गँगस्टर विकास दुबे याला अटक करण्यात आली आहे. कानपूरमध्ये आठ पोलीस कर्मचाऱ्यांच्या हत्येचा आरोप असलेल्या या दुबेला उज्जैनमध्ये बेड्या ठोकण्यात आल्या. त्याआधी विकासच्या तीन साथीदारांचं पोलिसांनी एन्काऊंटर केलं. गेल्या काही दिवसांपासून विकास दुबेचा शोध सुरू होता
विकास दुबेला मध्य प्रदेशातल्या महाकाल मंदिरातून ताब्यात घेण्यात आलं. मंदिराच्या सुरक्षा रक्षकांनी विकासला पकडल्याचची माहिती समोर आली आहे. विकासला पाहताच सुरक्षा रक्षक सतर्क झाले होते. त्यांनी विकासला पकडून याची माहिती तातडीनं पोलिसांना दिली.
गँगस्टर विकास दुबेने आधी उज्जैनच्या महाकालेश्वर मंदिरात दोन सहकाऱ्यासोबत दर्शन घेतले. सकाळी 9 वाजून 55 मिनिटांनी मंदिरासमोर त्याने स्वतःच्या नावाने आरडाओरडा केला. त्यानंतर स्थानिक पोलिस महाकालेश्वर मंदिरासमोर पोहोचले. घटनास्थळी स्थानिक प्रसारमाध्यमांनाही बोलवण्यात आले आणि विकास दुबेला अटक केली