लॉकडाउनमध्ये शाहरुख खानची पत्नी गौरी खान हि तिच्या पेंटिंगमुळे चांगलीच चर्चेत आली आहे तिने काढलेल्या पेंटिंगवरून नेटिझन्सने तिला ट्रोल केल्याचे समोर आले आहे.
लॉकडाऊन मध्ये गौरीने पेंटिंगचा आनंद घेतला आणि पेंटिंगचा फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला.काही लोकांना तिची पेंटिंग खूप आवडली, मात्र काही लोकांनी तिला खूप ट्रोल केले. काहींनी तिच्या चित्रकलेची तुलना वेलकम चित्रपटातील मजनू भाईच्या चित्रकलेशी केली.लॉकडाउनमध्ये तिने आपला बहुतेक वेळ चित्रकलेत घालवला. गौरी म्हणाली की कला चिकित्सात्मक, एक प्रकारची थेरपी देखील ठरू शकते. याव्यतिरिक्त, तिने आपली दोन एक्रेलिक चित्रे देखील पोस्ट केली आहेत. तिने व्हिडिओदेखील शेअर केला असून ज्यामध्ये देखील ती पेंटिंग्ज करताना दिसत आहे.
तिची पेंटिंग पाहून लोकांनी तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली. लोकांनी तिच्या चित्रकलेची तुलना मजनू भाईच्या चित्रकलेशी केली. ‘वेलकम’ या चित्रपटात अनिल कपूरने स्वत: ला एक चांगला चित्रकार मानणार्या मजनू भाईची भूमिका केली होती, परंतु लोकांना त्याची पेंटिंगला खरं तर काहीच अर्थ नसतो. अशा प्रतिक्रिया नेटिझन्सने दिल्या आहेत.