मुंबई : मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केल्याने अभिनेत्री कंगना राणौतवर नेते, अभिनेत्यांकडून टीकेचा भडीमार होऊ लागला आहे. यातच कंगनाने 9 सप्टेंबरला मुंबईत येत आहे, कोणाच्या बापात हिंमत असेल तर थांबवा, असे आव्हान दिल्याने हा वाद आता चिघळण्याची मोठा शक्यता निर्माण झाली आहे.
सिनेसृष्टीसोबतच आता राजकीय वर्तुळातून देखील कंगनावर अनेकांनी टीकेची झोड उठवली आहे. महाविकास आघाडीतील मंत्री आणि राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे यांनी देखील कंगनावर निशाण साधला आहे. मुंडे यांनी कंगनाच्या ट्विटला रिट्विट करत याच मुंबईने तुमच्या सारख्या अनेकांना आसरा दिलाय ग्लॅमर-करिअर दिल असल्याची आठवण कंगनाला करून दिले आहे.
तसेच कंगनाला खडे बोल सुनावत मुंडे यांनी लिहिले आहे एखादी व्यक्ती इतकं कृतघ्न दोनच परिस्थितीत वागू शकते, एकतर ती संस्कारानेच कृतघ्न घडलेली असते किंवा तिचे मानसिक संतुलन ढासळलेले असते. तसेच या ट्विटमध्ये धनंजय मुंडे यांनी गेट वेल सुन कंगना असा हॅश वापरून त्या खालोखाल लव्ह फॉर मुंबई असं देखील लिहिले आहे.
याच मुंबईने तुमच्या सारख्या अनेकांना आसरा दिला आहे, ग्लॅमर-करिअर दिलंय. एखादी व्यक्ती इतकं कृतघ्न दोनच परिस्थितीत वागू शकते, एकतर ती संस्कारानेच कृतघ्न घडलेली असते किंवा तिचे मानसिक संतुलन ढासळलेले असते. #GetWellSoonKangana #LoveforMumbai https://t.co/IJ4Cwetqey
— Dhananjay Munde (@dhananjay_munde) September 4, 2020
हे देखील वाचा
जनाची नव्हतीच, मनाची ही नाही आता कशाची तरी शिल्लक ठेवाhttps://t.co/hmcgslnk0g@amolmitkari22 @NCPspeaks @ShivsenaComms
— Political महाराष्ट्र (@PoliticalMH) September 4, 2020