IMPIMP
Give reservation to Maratha community from OBC Ajit Dada's MLA demands through letter Give reservation to Maratha community from OBC Ajit Dada's MLA demands through letter

“मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण द्या,” अजितदादाच्या आमदाराची पत्राद्वारे मागणी

पुणे : मराठा आरक्षणासंदर्भात मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आपलं उपोषण सुरू केलं आहे. सगेसोयऱ्यांची अंमलबजावणी लवकरात लवकर व्हावी, यासाठी त्यांनी अंतरवाली सराटीत उपोषण सुरू केलं आहे. त्यांच्या उपोषणाचा आज चौथा दिवस असून विविध राजकीय नेते त्यांच्या भेटीगाठी घेतांना दिसत आहेत. अशातच अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार बबनराव शिंदे यांनी ओबीसीमधून मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीला पत्र जाहीर करून पाठिंबा दर्शवला आहे.

हेही वाचा…“बारामतीचा दादा आता बदलायला हवा, युगेंद्र पवारांना विधानसभेची उमेदवारी द्या,” शरद पवारांकडे कार्यकर्त्यांची मागणी 

गेल्या काही महिन्यांपासून राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच गाजत आहे. अशातच बबन शिंदे यांनी ओबीसीमधून मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावं, अशी भूमिका त्यांनी आपल्या पत्राद्वारे जाहीर केली आहे. त्यांनी आपल्या पत्रात असं म्हटलंय की, मराठा समाज पुर्वीपासून आरक्षणापासून वंचित असल्याने मराठा समाजातील तरूण-तरूणींना प्रत्येक क्षेत्रामध्ये अडचणींचा सामना करावा लागत आहे. मराठा समाजाच्या तीव्र भावना लक्षात घेता त्यांना न्याय देण्याच्या दृष्टीने सरकारने मराठा समाजास आरक्षण देणे आवश्यक आहे.

हेही वाचा..पावसाच्या पाण्याच्या निचऱ्यासाठी तातडीने उपाययोजना करा..! मंत्रीपदाची शपथ अन् पहिल्याच दिवसापासून कामाला सुरुवात 

तसेच मराठा मसाज बांधवाला ओबीसीमध्ये कुणबी मराठा सगे सोयरे या शब्दाचा आंतरभाव करून लाभ मिळण्यासाठी मौजे अंतरवाली सराटी येथे उपोषणाला बसलेल्या मराठा समाज आरक्षणाचे जनक मनोज जरांगे पाटील यांचे मराठा आरक्षणासा मी माढा तालुका व माढा विधानसभा मतदारसंघाच्या वतीने जाहीर पाठिंबा देत आहे. असेही त्यांनी आपल्या पत्रात म्हटलंय.

READ ALSO :

हेही वाचा…“राज्याच्या मंत्रिमंडळ विस्तारात आम्हालाही स्थान द्या”, सदाभाऊंची मोठी मागणी 

हेही वाचा..“सगळ्यात आधी नरेंद्र मोदींनी “त्या” दोन अतृप्त आत्म्यांची शांती करायला हवी” 

हेही वाचा…कोण होणार लोकसभेचे अध्यक्ष ? आंध्र प्रदेशच्या ‘या’ महिलेची जोरदार चर्चा 

हेही वाचा..राज्यातील ‘सहा’ मंत्र्यांवर सोपविली विविध खात्याची जबाबदारी, वाचा सविस्तर 

हेही वाचा..राष्ट्रवादीच्या वर्चस्वाला धक्का देण्यासाठी मोहोळांकडे सहकार खाते, भाजप नेतृत्वाची महाराष्ट्रात मोठी खेळी