कोल्हापूर: पूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या गोकुळच्या निवडणुकीत विरोधी पालकमंत्री सतेज पाटील आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ गटाने विजयी सलामी देत राखीव गटात विजय मिळविला. अनुसूचित जाती जमाती गटातून माजी आमदार सुजित मिणचेकर यांनी विलास कांबळे , भटक्या विमुक्त जाती जमाती गटात बयाजी शेळके यांनी विश्वास जाधव , इतर मागासवर्गीय गटात अमरसिंग पाटील आणि पी . डी . धुंदरे यांचा पराभव केला आहे. अमरसिंग पाटील यांनी ४३६ , सुजित मिणचेकर यांनी ३४६ तर बायजी शेळके यांनी २३ ९ मतांनी विजय मिळविला .
अवघ्या राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या गोकुळ दूधसंघाच्या निवडणुकीची मतमोजणी सुरु असून , त्यामध्ये चुरस निर्माण झाली आहे जिल्ह्याच्या राजकारणात पालकमंत्री सतेज पाटील आणि माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्या राजकीय संघर्षात गोकुळ केंद्रस्थानी होता. नुकत्याच आलेल्या निकालानुसार आता खासदार संजय मंडलिक यांचे चिरंजीव वीरेंद्र मंडलिक आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांचे चिरंजीव नावेद मुश्रीफ यांनी मतमोजणीत आघाडी घेतली आहे आणि ते विजयाच्या उंबरठ्यावर पोहोचले आहे.
गोकुळच्या राखीव गटात सतेज पाटील गटाने बाजी मारल्यानंतर आता सर्वसाधारण गटाची मतमोजणी सुरू झाली आहे . १६ जागांसाठी ३३ उमेदवार रिंगणात असून पाचव्या फेरीच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे . क्रॉस व्होटिंग होत असल्याचे दिसून येत आहे .पाचव्या फेरीअखेर तब्ब्ल १३ जागांवर सतेज उर्फ बंटी पाटील-मुश्रीफ गट आघाडीवर पोहोचला आहे. यामुळे आता गोकुळचा निकाल स्पष्ट होण्यास सुरुवात झालेली आहे. आणखी तीन फेऱ्यांचे निकाल आता फक्त बाकी राहिलेले आहेत.