भारतात जागतिक महामारीने मोठ्या प्रमाणावर थैमान घातले आहे. देशात दिवसेंदिवस लाखांच्यावर संक्रमित रुग्णांची वाढ होत आहे. महाराष्ट्र, दिल्ली, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, राजस्थान, उत्तराखंड या राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर रुग्ण वाढ झालेली दिसून येत आहे. त्यातच ऑक्सिजनचा कमी साठा, लसींची कमतरता, औषधांचा तुटवडा यांसारख्या समस्यांनी देशाला विळखा घातला आहे. आता देशात लसीकरण करण्यासाठी आणि ऑक्सिजन तसेच रेमेडीसीवर च्या पुरवठ्या साठी भारतीय वंशाचे असणारे आणि परदेशात मोठ्या हुद्द्यावर नोकरी करणारे अथवा मोठ्या कंपन्यांचे सीईओ असणारे लोक आता भारतासाठी मोठया प्रमाणावर मदत करण्यास सुरुवात करत आहे.
या महामारीच्या पहिल्या लाटेमध्ये अवघ्या जगाच्या मदतीला धावून जाणाऱ्या भारताला दुसऱ्या लाटेमध्ये घेरले आहे. अशावेळी अमेरिकेच्या दोन बड्या कंपन्या, ज्यांचे सीईओ भारतीय आहेत त्यांनी मोठी मदत देऊ केली आहे. मायक्रोसॉफ्ट आणि गुगलने या मदतीची घोषणा केली आहे. मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नाडेला यांनी अत्यंत दु : खी असल्याचे म्हटले आहे. तसेच कंपनीची सारी ताकद भारतासाठी लावणार असल्याची घोषणा केली आहे. तर दुसरीकडे जगातील सर्वात मोठे सर्च इंजिन असणारे गूगलने आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांनी भारताच्या मदतनिधीमध्ये १३५ कोटी रुपयांची मदत देऊ केली आहे. Google CEO Sundar Pichai announces Rs 135 crore aid to India
मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नाडेला Satya Nadella, CEO of Microsoft यांनी, भारतातील कोरोना परिस्थिती पाहून आपले हृदय दुखावले असल्याचे म्हटले आहे. भारतात दिवसाला लाखो रुग्ण सापडू लागले आहेत. आपली कंपनी भारतीयांना सर्वतोपरी मदत करण्यासाठी आपले तंत्रज्ञान आणि ऑक्सिजन यंत्रणा खरेदीसाठी मदत करणार असल्याचे सांगितले .तर अमेरिकेचीच आणखी एक कंपनी गुगल Google आणि अल्फाबेटचे भारतीय वंशाचे सीईओ सुदर पिचाई Sundar Pichai यांनी देखील युनिसेफच्या भारतासाठीच्या मदतीच्या फंडामध्ये आपली कंपनी १३५ कोटी रुपये देणार असल्याची घोषणा केली. तसेच भारताला फायदा न घेता वैद्यकीय मदत, कोरोनाच्या प्रसाराची आणि रोखण्याची सर्व माहिती लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.
Devastated to see worsening Covid crisis in India. Google & Googlers are providing Rs 135 Crores in funding to GiveIndia, UNICEF for medical supplies, org supporting high-risk communities, and grants to help spread critical information: Google CEO Sundar Pichai
(File photo) pic.twitter.com/3Iy7I7FbAg
— ANI (@ANI) April 26, 2021