IMPIMP
Hake's delegation will interact with the Chief Minister, there is a big commotion in Mumbai this evening Hake's delegation will interact with the Chief Minister, there is a big commotion in Mumbai this evening

हाकेंचं शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांशी संवाद साधणार , मुंबईत आज सायंकाळी मोठी खलबतं

जालना : मागील नऊ दिवसापासून वडीगोद्री येथे ओबीसी आरक्षण बचावासाठी लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांचे उपोषण सुरू आहे. या उपोषण कर्त्यांची आज राज्य सरकारच्या शिष्टमंडळाने आज भेट घेतली. यावेळी मंत्री गिरीश महाजन, उदय सामंत, अतुल सावे यांच्यासह गोपीचंद पडळकर यांनी लक्ष्मण हाके यांच्याशी संवाद साधला. यावेळी गिरीश महाजन यांनी थेट उपोषण स्थळावरून राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन करून सध्यस्थिती सांगितली. तर तुमचं शिष्टमंडळ मंबईला पाठवा, त्यावर आपण चर्चा करू. असं आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी दिलंय.

हेही वाचा..“शिंदेंचा गट भाजपकडे गहाण असल्याची रामदास कदमांनी कबुली दिली”, ठाकरे गटाने डिवचलं

गेल्या अनेक दिवसापासून ओबीसी आरक्षण बचावासाठी लक्ष्मण हाके उपोषणासाठी वडीगोद्री येथे सुरू आहे. यातच उपोषण स्थळावर राज्यातील विविध भागातून ओबीसी बांधव दाखल झाले आहेत. तर काही ठिकाणी ओबीसी समाजाकडून रस्ता आंदोलन केले जात आहे. तर काही ठिकाणी रस्त्यावर डायर जाळून सरकारचा निषेध व्यक्त केला जात आहे.

यातच देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसी नेत्यांचं शिष्टमंडळ मुंबईला पाठवावं असं म्हटलं आहे. तर यामध्ये आता छगन भुजबळ, पंकजा मुंडे, धनंजय मुंडे, आणि गोपीचंद पडळकर यांचा समावेश असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आज हे शिष्टमंडळ मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करणार आहेत. यासह लक्ष्मण हाकेंच्या चार समर्थकांचा देखील यामध्ये समावेश केला जाणार आहे.

हेही वाचा..लक्ष्मण हाकेंच्या उपोषण स्थळावरून वडेट्टीवारांचा मुख्यमंत्र्यांना फोन, ओबीसी आरक्षणाबाबत शिंदेंनी दिला हा शब्द 

दरम्यान, सगेसोयरे अध्यादेश आणि ८ लाख हरकतींसंदर्भात सरकारने अॅक्शन टेकन रिपोर्ट समोर आणावा. सरकारने जनतेसमोर यावं आणि आपलं म्हणणं मांडावं. गेल्या ८ ते ९ महिन्यात ज्या कुणबी नोंदी केल्या गेल्या. त्यासंदर्भात सरकारनं श्वेतपत्रिका जाहीर करावी. यासह जातीचा दाखला आणि जात पडताळणी क्रमांक पॅन कार्ड किंवा आधार कार्डला लिंक करा. जेणेकरून खऱ्या मागासवर्गीयांवर अन्याय होणार नाही. यातच सगेसोयऱे शब्दाचा उल्लेख हिंदू, लॉ. मुस्लिम पर्सनल लॉ. ख्रिश्चन लॉ यात आहे का ?

भारतीय न्यायव्यवस्था किंवा न्याय निवाडे यामध्ये व्याख्या आहे का ? असा सवाल करत व्याख्या असल्याच सरकारच्या कायदे आणि सल्लागार आणि आम्हाला सांगावं. अशी मागणी देखील त्यांनी केलीय. सरकारने नवीन काहीतरी करण्याच्या फंदात पडू नये. असेही त्यांनी सांगितलं आहे.

READ ALSO :

हेही वाचा…बच्चू कडूंच्या जीवाला अज्ञातांकडून धोका, पोलिसांना लिहिलं ‘हे’ पत्र 

हेही वाचा…लक्ष्मण हाकेंच्या भेटीसाठी सरकारचं शिष्टमंडळ दाखल, सरकारने घेतला हा निर्णय

हेही वाचा..“ज्याचा मी प्रचार केला असता तो ४८ मतांनी नाही तर..”, गजानन किर्तीकर यांचं मोठं विधान 

हेही वाचा..मंत्रीपदाच्या ‘रेस’मधील आमदार आण्णा बनसोडेंना ‘नेटीझन्स’नी धुतले! राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षांचा दुटप्पीपणा उघड्यावर 

हेही वाचा..मंत्रीपदाच्या ‘रेस’मधील आमदार आण्णा बनसोडेंना ‘नेटीझन्स’नी धुतले! राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षांचा दुटप्पीपणा उघड्यावर

Leave a Reply