मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज ७० वा वाढदिवस आहे. या निमित्ताने त्यांच्यावर जगभरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. सोशल मीडियावर त्यांच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना केल्या जात आहेत. तसेच संपूर्ण देशातून पंतप्रधानांचा वाढदिवस मोठ्या जल्लोषात साजरा केला जात आहे.
काँग्रेस नेते राहुल गांधी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह अनेक केंद्रीय मंत्री, नेते आणि मान्यवरांनी पंतप्रधानांना शुभेच्छा दिल्या आहेत. राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांची पत्नी अमृता फडणवीस यांनीही पंतप्रधान मोदी यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
भारताला इतर कोणत्याही देशाचे अनुकरण करण्याची गरज नाही! भारत हा फक्त भारतच बनला पाहिजे कारण एकेकाळी भारताला ‘सोने का चिड़िया’ म्हटलं जात होतं असं पंतप्रधान मोदी यांचं वक्तव्य होतं. हे वाक्य ट्विट करत अमृता फडणवीस यांनी मोदींचा उल्लेख ‘नव्या भारताचे पितामह’ असा केला आहे. पंतप्रधान मोदींसारख्या अनुभवी नेतृत्वाला (विकासाचा) मार्ग माहिती आहे, ते मार्ग जाणतात आणि मार्ग दाखवतात! अशा दूरदर्शी नेतृत्वाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, असेही त्यांनी ट्विटमध्ये लिहिले आहे.
“India dosen’t need to emulate any other country! India must become only India!This is a country that once upon a time was called-सोने की चिड़िया”
-Narendra Modi
He knows the way,goes the way & shows the way! Warm birthday wishes to visionary father of New India @narendramodi ji pic.twitter.com/rawkIbAiy4— AMRUTA FADNAVIS (@fadnavis_amruta) September 17, 2020