पुणे : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते महायुतीचे काम करत असून कार्यकर्ते थोडी गडबड करत आहेत. माझे बारकाईने लक्ष आहे. देश डोळ्यासमोर ठेऊन एकदिलाने काम करायचे आहे. एकमेकांवर ढकला-ढकली करू नका. विरोधात काम करून गालबोट लागू देऊ नका. दगाफटका केल्यास सहन करणार नाही, असे म्हणत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे अध्यक्ष अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना ठणकावले. महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्यासाठी अजित पवारांची कामशेत येथे प्रचार सभा पार पडली. त्यावेळी ते बोलत होते.
पुढे बोलतांना ते म्हणाले की, महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघोरे यांनी माझे पाय धरून मी आशीर्वाद दिल्याचे सांगत समाजमाध्यमवर छायाचित्रे प्रसारित केली. त्यांची नौटंकी सुरू असून मी एकदा निर्णय घेतल्यानंतर कोणाच्या बापाचे ऐकत नाही, असेही ते म्हणाले. मागीलवेळी एकमेकांविरोधात विधानसभा, लोकसभेची निवडणूक लढलो आहोत, पण आता ते सर्व विसरायचे आहे. विकासकामे करण्यासाठी महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या सर्व कार्यकर्त्यांनी महायुतीचे काम करायचे असल्याचेही त्यांनी सांगितले.
हेही वाचा…‘घर चलो’ अभियानातून भाजपा कार्यकर्ते दहा लाख घरात पोहोचणार !
माझे बारकाईने लक्ष आहे. नात्यागोत्याची निवडणूक नाही. १३ मे पर्यंत नातीगोती बाजूला ठेवावीत. कोणी दगाफटका केल्यास मी सहन करणार नाही. असेही अजित पवारांनी सांगितले. तर मागील आठवड्यात मी पिंपरीत लग्नाला आलो. मी कधी येतो. यावर लक्ष ठेऊन वाघेरे बसले होते. मी आल्यानंतर ते माझ्या पाया पडले. मी आशीर्वाद दिल्याचे सांगत समाजमाध्यमावर छायाचित्रे प्रसारित केली. ही नौटंकी असून याला काही अर्थ नाही. मी एकदा निर्णय घेतला की कोणाच्या बापाचे एकत नाही. मी कधीही मॅच फिक्सिंग केली नाही. असेही ते म्हणाले.
दरम्यान, विरोधकांकडे कोणताच मुद्दा नाही. वाटेल ते बोलत आहेत. राज्य घटना बदलणार असल्याचे सांगून मागासवर्गीयांना अस्वस्थ करत आहेत. असा आरोप करत पवार म्हणाले की, तळेगाव, चाकण, रांजणगाव एमआयडीसी वाढत आहे. विस्तार होत असून नवीन कारखाने येत आहेत. अडचणीमुळे काही कारखाने बंद पडत आहेत. असेही अजित पवारांनी नमुद केले.
READ ALSO :
हेही वाचा..धंगेकरांच्या पाठीमागे लागली साडेसाती, भाजपकडून निवडणुक आयोगात तक्रार दाखल
हेही वाचा…“श्रीरंग बारणे मोठ्या मताधिक्याने निवडून येणार”, महादेव जानकरांना मोठा विश्वास
हेही वाचा..“मावळच्या विकासात खासदार बारणे यांचा सिंहाचा वाटा” , नितीन गडकरींची बारणेंसाठी सभा