पुणे (प्रतिनिधि) पुणे लोकसभा मतदार संघात चौरंगी लढत होत असली तरी खरी लढत ही महायूतीचे मुरलीधर मोहोळ विरुद्ध रवींद्र धंगेकर अशीच होणार आहे. दरम्यान, उमेदवारी जाहीर झाल्याच्या पहिल्या दिवसापासून , महायूतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी विविध क्षेत्रातील मान्यवर, विविध समाज विविध घटक याबरोबरच मेळावे, वैयक्तिक भेटीगाठी आणि पदयात्रेच्या माध्यमातून सहाही विधानसभा मतदार संघ पिंजून काढले आहेत. दुसरीकडे महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर, वंचित बहुजन आघाडीचे वसंत मोरे आणि एमआयएमचे अनिस सुंडके यांचाही त्यांच्या परीने प्रचार सुरू आहे.
हेही वाचा..“याला नाटकाच्या कामातून वेळ मिळेना”, अजित पवारांची कोल्हेंवर आगपाखड
रवींद्र धंगेकर यांना सुरुवातीपासूनच पक्षांतर्गत कुरघोड्या आणि आघाडीतील सुंदोपसुंदीने ग्रासले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेला मिळालेला प्रचंड प्रतिसाद यामुळे महायूतीच्या गोटात चैतन्याचे वातावरण आहे. तर दुसरीकडे कॉँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची सभा झाल्यानंतरही कॉँग्रेसमध्ये स्थानिक पातळीवर सर्वकाही अलबेल असल्याचे दिसत नाही. कॉँग्रेस वारिष्ठांचा स्थानिक नेतृत्वावरचा विश्वास उडालेला दिसतो आहे. कारण स्थानिक नेत्यांवर अवलंबून न राहता कॉँग्रेसला धंगेकर यांच्या प्रचारासाठी राज्यातील बारा आमदारांसह पराराज्यातील लोकप्रतिनिधींना पाचारण करण्याची वेळ आली आहे. शेवटच्या टप्प्यात कॉँग्रेसने उचलेले हे पाऊल रवींद्र धंगेकरांना तारणार का? हा औत्सुक्याचा विषय ठरला आहे.
हेही वाचा…शिवाजीराव आढळराव पाटलांना विविध संघटनांचा पाठिंबा
मुरलीधर मोहोळ यांची आहे ही जमेची बाजू
पुणे लोकसभा मतदार संघातील सहा विधानसभा मतदार संघांपैकी शिवाजीनगर, कोथरूड, पर्वती, पुणे कॅंटॉन्मेंट या चार मतदार संघात भाजपचे आमदार आहेत. वडगाव शेरीमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाचे सुनील टिंगरे हे आमदार आहेत.
हे पाचही आमदार आपपल्या मतदार संघात पूर्ण ताकदीनिशी मोहोळ यांच्या प्रचारात उतरले आहेत. वडगावशेरीमध्ये आमदार सुनील टिंगरे आणि भाजपचे माजी शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांच्यामुळे मोहोळ यांना दुहेरी ताकद मिळाली आहे. दरम्यान, सुरुवातीला उमेदवारी मिळण्यावरून असलेली इच्छुकांची नाराजीही संपल्याचे दिसून येत असून माजी खासदार संजय काकडे, सुनील देवधर हेही सक्रिय झाले आहेत. महायूतीचे घटक पक्षातील एकवाक्यता आणि नियोजनबद्ध प्रचार यामुळे मोहोळ यांच्या प्रचारात जोर दिसून येत आहे. राज्याचे नेतेही लक्ष ठेऊन आहेत.
मनसेच्या पाठिंब्यामुळे मोहोळांची बाजू अधिक भक्कम
मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींना पाठिंबा जाहीर केल्यानंतर पुण्यातील मनसेचे सर्व पदाधिकारी मोहोळ यांच्या प्रचारात सक्रिय झाले आहेत. त्यातच राज ठाकरे यांच्या मोहोळ यांच्या प्रचारासाठी शुक्रवारी जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. मनसेची पुण्यामध्ये एक मोठी वोंटबँक आहे. त्याचाही फायदा मोहोळ यांना होणार आहे.
READ ALSO :
हेही वाचा..“मावळच्या विकासात खासदार बारणे यांचा सिंहाचा वाटा” , नितीन गडकरींची बारणेंसाठी सभा
हेही वाचा…‘घर चलो’ अभियानातून भाजपा कार्यकर्ते दहा लाख घरात पोहोचणार !
हेही वाचा..“बिनकामाच्या खासदाराला आता घरी बसवा”, आढळरावांची कोल्हेंवर सडकून टिका