IMPIMP
Harshwardhan Patil with Ajit Pawar Harshwardhan Patil with Ajit Pawar

इंदापुरात हर्षवर्धन पाटलांचं ठरलं, अजित पवार गट काय भूमिका घेणार ?

इंदापुर : 2019 च्या विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेले भाजपचे नेते आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटलांनाकडून पुन्हा विधानसभा निवडणुक लढण्याचे संकेत देण्यात आले आहे. सध्या इंदापुर मतदारसंघात अजित पवार गटाचे दत्तात्रय मामा भरणे आमदार असून महायुतीत ही जागा अजित पवार गटाला मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तरी सुध्दा हर्षवर्धन पाटलांकडून विधानसभा निवडणुक लढण्याची तयारी सुरू केल्याची माहिती समोर येत आहे.

आमचा स्वाभिमान आमचे विमान, आमचं आता ठरलंय, तयारी लागा अशा आशयाचे बॅनर इंदापुरात झळकले आहेत. हर्षवर्धन पाटलांच्या समर्थकांकडून ही बॅनरबाजी करण्यात आली असली तरी याला हर्षवर्धन पाटलांचा होकार असल्याचे समजत आहे. या बॅनरवर विमान चिन्ह्याचा देखील उल्लेख करण्यात आल्याने हर्षवर्धन पाटील अपक्ष निवडणुक लढणार का ? असा सवाल देखील यानिमित्ताने उपस्थित केला जाऊ लागला आहे. कारण याआधी दोन वेळा हर्षवर्धन पाटलांनी विमान या चिन्ह्यावर अपक्ष निवडणुक लढवली होती.

“अजितदादा माझे चांगले मित्र, सरकार यावं अन् मी मंत्री व्हावं,” विजय शिवतारेंचं विधान 

यातच सध्या महायुतीत विद्यमान आमदारांच्या जागा त्याच पक्षाला देण्यात येतील असं सुत्र ठरल्याची चर्चा आहे. त्यामुळेच इंदापुरची जागा अजित पवार गटाला जाण्याची शक्यता असल्याने हर्षवर्धन पाटलांनी सावध भूमिका घेतली आहे. यातच लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान हर्षवर्धन पाटलांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांची चर्चा केल्याचे दिसून आलेत. मात्र इंदापुरमधून सुनेत्रा पवारांना लीड मिळालं नसल्याने अजित पवार आता ही जागा सोडणार नाही. अशीही चर्चा दुसऱ्या बाजूला सुरू झाली आहे. असं असेल तर हर्षवर्धन पाटील अपक्ष निवडणुक लढविण्यावर ठाम राहिले तर याठिकाणी तिरंगी लढत अटळ असल्याचे स्पष्ट होत आहे.

हेही वाचा..“आधी धमकी नंतर दिलगिरी,” अंबादास दानवेंचं सभापतींना पत्र 

दरम्यान, आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीतून अजित पवार गटातील दत्तामामा भरणे यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. दुसऱ्या बाजूला हर्षवर्धन पाटील यांच्या कन्या अंकिता पाटील सुद्धा मतदारसंघातून इच्छूक आहेत. त्यामुळे महायुतीच्या जागा वाटपामध्ये हा मुद्दा कळीचा ठरण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडीत ही जागा शरद पवार गटाला मिळणार असून इंदापुर बाजार समितीचे संचालक असलेले आप्पासाहेब जगदाळे विधानसभा निवडणुक लढवण्यासाठी इच्छूक आहेत. गेले वीस वर्षे एकमेकांचा राजकीय विरोधक असलेले पाटील व भरणे महायुतीमुळे लोकसभेला एकत्र आले. परंतु विधानसभा निवडणुकीसाठी दोघे काय भूमिका घेणार ? ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

READ ALSO :

हेही वाचा..शिंदे अन् ठाकरेंच्या नेत्यांची गुप्त भेट, राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ 

हेही वाचा..पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रवादीला गळती सुरूच, अजित पवारांनी आणखी एक धक्का 

हेही वाचा…पर्वतीमध्ये भाजपच्या नेत्यांमध्ये उमेदवारीसाठी मोठी रस्सीखेच, श्रीनाथ भिमाले की माधुरी मिसाळ ? एकच चर्चा

हेही वाचा…जरांगे पाटलांच्या जीवाला धोका, झेड प्लस सुरक्षा देण्याची मराठा बांधवांची मागणी 

हेही वाचा…“मिलिंद नार्वेकरांमुळे कॉंग्रेसचा उमेदवार पडणार”?शिंदे गटातील आमदाराचा मोठा दावा 

Leave a Reply