चंदीगढ – कोरोना लशीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणीत स्वयंसेवक झालेले हरियाणाचे आरोग्य आणि गृहमंत्री अनिल विज यांना कोरोनाची लागण झाली आहे. विज यांनी ट्विटरच्या माध्यामातून याबाबतची माहिती दिली आहे. तसेच आपल्या संपर्कात आलेल्यांनाही तातडीने कोविडची चाचणी करण्याचं आवाहन विज यांनी केलं आहे.
हरियाणामध्ये २० नोव्हेंबर रोजी ‘कोवॅक्सीन’ या कोरोनावरील लशीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणीला सुरुवात झाली होती. यात अनिल विज यांनी स्वत:हून पुढे येत चाचणीसाठी तयारी दर्शविली होती. २० नोव्हेंबर रोजी विज यांनी कोवॅक्सीनचा पहिला डोस घेतला होता. विज यांच्यासोबत २०० जणांना कोवॅक्सीनचा डोस देण्यात आला होता. दुसरा डोस २८ दिवसांनंतर देणार असल्याचं सांगितलं गेलं होतं. पण त्याआधीच अनिल विज हे कोरोना पॉझिटीव्ह असल्याचं समोर आलं आहे.
“मी कोरोना संक्रमित असल्याचं आढळून आलं आहे. अंबालाच्या सिव्हील रुग्णालयात माझ्यावर उपचार सुरू असून माझ्या संपर्कात आलेल्यांनी तातडीने कोविडची चाचणी करुन घ्यावी”, असं ट्विट अनिल विज यांनी केलं आहे.
I have been tested Corona positive. I am admitted in Civil Hospital Ambala Cantt. All those who have come in close contact to me are advised to get themselves tested for corona.
— ANIL VIJ MINISTER HARYANA (@anilvijminister) December 5, 2020