पारनेर : सध्या अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाने थैमान घातले आहे. पारनेरचे आमदार निलेश लंके यांनी ११०० बेड्स चे कोविड सेंटर स्थापन केले आहे. शरदचंद्रजी पवार कोविड सेंटर नाव देत त्यांनी रुग्णांना बरे करण्याचा सपाटा लावला आहे. मात्र आता आमदार निलेश लंके यांच्यावर टीका करण्यात आलेली आहे. तालुक्यातील एका कोविड सेंटर मध्ये एका बाबाने रुग्णाला चाटण दिलेले चालते, कोविड सेंटरमध्ये नर्तकांना नाचवले तरी देखील चालते, मात्र आम्ही आमच्या कोविड सेंटर मध्ये यज्ञ घातल्याने आमच्या विरोधात तक्रार केली जाते, असा आरोप माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुजित झावरे यांनी केला आहे.
कोरोना बाधित रुग्णांसाठी सुजित झावरे यांनी स्वर्गीय आमदार वसंतराव झावरे यांच्या नावाने अद्यावत कोविड सेंटर सुरु केले आहे. तर पारनेरमध्ये निलेश लंके यांनी शरदचंद्रजी पवार यांच्या नावाने कोविड सेंटर सुरू केले आहे. निलेश लंकेने ११०० बेडचे कोविड सेंटर उभारले खरे, मात्र आता त्या सेंटरच्या नावाखाली लंके कोरोना स्पेड परसवताय की काय?, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. कारण कोविड सेंटरमध्ये लंके हे विनामास्क फिरतात. रुग्णांच्या हातात हात देणे, विना पीपीई किट घातला सेंटरमध्ये फेरफटका मारणे, कोणत्याही प्रकारची काळजी न घेणे. आता तर त्यांनी चक्क कोविड सेंटरमध्ये नाच-गाणे सुरू केले आहेत. भजन, गायन, किर्तन, लावणी अशा प्रकारच्या कार्यक्रमामुळे सेंटरमधील रुग्ण त्यांच्या ठेक्याला ठेका धरताना पाहायला मिळतात. यामुळे कोरोना कमी होण्याऐवजी वाढणार नाही का?, असा प्रश्न निर्माण झाला आहे. कोविड सेंटरमध्ये रुग्ण बरे करण्याच्या नावाखाली रुग्णांना मृत्यूच्या खाईत तर निलेश लंके लोटत नाहीत ना?, असाही प्रश्न निर्माण होतो.
दरम्यान, झावरे यांनी सुरू केलेल्या कोविड सेंटरमध्ये कोरोना बाधितांना मानसिक आधार मिळावा आणि शांती मिळावी म्हणून मी श्रद्धेने कोविड सेंटरपासून दूर केलेल्या विश्व्शांती यज्ञाला अंधश्रद्धा निर्मूलन समिती अंधश्रद्धा ठरवत आहे. रुग्णांच्या भल्यासाठी जर मी ईश्वराजवळ प्रार्थना केली आणि जर ती प्रार्थना म्हणजे गुन्हा असेल तर मी नक्कीच गुन्हा केला आहे. अंनिसला दुसऱ्या कोविड सेंटरमधील प्रकार दिसत नाही आणि त्यांची भूमिका दुट्टपी आहे असे देखील सुजित झावरे यांनी म्हटले आहे.
सुजित झावरे म्हणाले की, या कोविड सेंटरचे मी थाटामाटात उद्घाटन केले नाही. अथवा तेथे सेलिब्रिटी आणून फोटो सेशनही केले नाही. तेथील रुग्णांसाठी मी कोविड सेंटर बाहेर काही अंतरावर गुरुवारी (दि. 20) हिंदू धर्मशास्त्रानुसार विश्वशांती यज्ञ केला. यामागे रुग्ण बरे व्हावेत, अशी माझी श्रद्धा होती. हा यज्ञ मी माझ्या खासगी शाळेत केला. यज्ञ अथवा हवनाचा उल्लेख पुराण, वेद, ज्ञानेश्वरीसह धार्मिक ग्रंथांत आहे. लग्न करतानाही आपण होम करतो. मग तेही चुकीचे आहे का?, विदेशात व केंब्रिज विद्यापीठात वेद, होम हवनावर पीएचडी होत आहेत. होम हवन ही श्रद्धा आहे. तिला अंधश्रद्धा म्हणता येणार नाही. रुग्णांसाठी ईश्वराजवळ प्रार्थना केली तर गुन्हा काय?, इतर कोविड सेंटरमध्ये रुग्णांसमोर नृत्यांगणांची लावणी झाली. महिला रुग्णांनाही नाचायला लावले. शिट्टया वाजल्या. एका बाबाने येऊन रुग्णांना चाटण दिले. मंत्री आले, त्यावेळी सोशल डिस्टन्सचा फज्जा उडाला. हे अंनिसला का दिसले नाही, असा सवाल त्यांनी केला.