फुरसुंगी : राज्यातील तिसऱ्या टप्यात मतदान होत असलेल्या मतदारसंघात अवघे काही दिवस प्रचारासाठी उरले आहेत. देशाचे लक्ष लागलेल्या बारामतीमध्ये तिसऱ्या टप्यात मतदान होणार आहे. अशातच सुनेत्रा पवार यांच्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभा घेतली. या सभेत लोकसभेच्या बारामती मतदार संघातील गावांना निधी कमी पडू न देता विकास रखडलेल्या या भागाचा विकास करणार आहे. असे आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी बारामती जनतेला दिले.
हेही वाचा….राहुल गांधींच्या सभेअगोदरच काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांमध्ये शाब्दिक चकमक
बारामती लोकसभा मतदार संघातील फुरसुंगी भेकराईनगर येथे महायुतीचे उमेदवार सुनेत्रा अजित पवार यांच्या प्रचारार्थ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सभेचे आयोजन केले होते. याप्रसंगी महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार, माजी मंत्री विजय शिवतारे, भाजप जिल्हा अध्यक्ष वासुदेव काळे, माजी आमदार अशोक टेकवडे, पश्चिम महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष जालिंदर कामठे, प्रा. दिगंबर दुर्गाडे, मंगलदास बांदल, माजी नगरसेवक गणेश ढोरे, संदीप हरपळे आदी उपस्थित होते.
महापालिकेत समाविष्ट होऊन देखील या भागाचा आवश्यक विकास झाला नाही. येथील मिळकत कर ज्या प्रमाणात सुविधा मिळतील. त्याच प्रमाणात आकारण्यासाठी प्रयत्न करणार आहे. असे फडणवीस यांनी सभेत बोलताना सांगितले. कांचन कुल याना दिलेले साडेपाच हजारांचे लीड हे डबल करून सुनेत्रा पवार यांना येथील जनता नक्किच निवडून देईल, असा विश्वास देखील फडणवीस यांनी व्यक्त केला.
यावेळी विजय शिवतारे म्हणाले की, येथील पाणी प्रश्न देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही मार्गी लावला. सुप्रिया सुळे यांनी एका रुपयाचे देखील काम केले नाही. ही निवडणूक भावकीची नसून देशाची आहे. त्यामुळे अजित दादा जो शब्द देतील तो आम्ही सर्वजण पूर्ण करू.
सुनेत्रा पवार म्हणाल्या की , महायुतीचे एक मजबूत संघटन निर्माण झाले आहे. देशाच्या विकासासाठी आपल्याला नरेंद्र मोदी यांना पुन्हा एकदा पंतप्रधान करायचा आहे. यासाठी फुरसुंगी – उरळी देवाची च्या मतदारांनी मला भरघोस मातांनी निवडून द्यावे, ही विनंती.
READ ALSO :
हेही वाचा…आढळरावांसाठी भाजपच्या वतीने भोसरीत बैठकांचा सपाटा, महेश लांडगे मैदानात
हेही वाचा..“खायचं कसं ? म्हणूनच अजितदादांकडे अर्थखातं,”ओमराजे निंबाळकरांची जोरदार फटकेबाजी
हेही वाचा…मोठी बातमी… ! शरद पवारांच्या ताफ्यातील गाड्यांचा भीषण अपघात, मोठी माहिती समोर