IMPIMP
praniti shinde vs narasayya adam praniti shinde vs narasayya adam

कट्टर विरोधक, लोकसभेला साथ दिली, आता विधानसभेचं वेध, कॉंग्रेस जागा सोडणार का ?

सोलापूर : कॉंग्रेसच्या नेत्या प्रणिती शिंदे खासदार झाल्यापासून आता त्यांच्या सोलापुर मध्य विधानसभा मतदारसंघाची चर्चा सुरू झाली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत सोलापुर मध्यची जागा आता माकपाला सोडण्यात यावी अशी मागणी माजी आमदार नरसय्या आडम मास्तरांनी केली आहे. आडम मास्तरांनी विधानसभेची तयारी देखील सुरू केली होती. लोकसभेच्या निवडणुकीत आडम मास्तर यांनी प्रणिती शिंदे यांच्या पाठीमागे आपली ताकद लावली होती. त्यानंतर आता आडम मास्तर उमेदवारीसाठी ठाण मांडून बसले आहेत.

हेही वाचा..शिंदे अन् ठाकरेंच्या नेत्यांची गुप्त भेट, राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ 

लोकसभा निवडणुकीत प्रणिती शिंदे यांन तिकीट जाहीर झाल्यानंतर सोलापुर मध्यची जागा आम्हाला सोडण्यात यावी अशी मागणी आडम मास्तरांनी केली होती. त्यानंतर त्याची चर्चा आता सुरू झाली आहे. यातच सध्या नोट भी दोन वोट भी दो असा अभियान आडम मास्तरांकडून राबविण्यात येत आहे. आमचा पक्ष हा गोरगरिब आणि कष्टकऱ्यांचा आहे. निवडणुकीत पैसा लागतो. मात्र आमच्याकडे पैसे नसल्याने जनतेला आम्ही वोट भी दो आणि नोट भी दो असे आवाहन करतोय. जनतेकडून लोकवर्गणी घेऊन मी निवडणुकीच्या रिंगणात उतरणार अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.

हेही वाचा..पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रवादीला गळती सुरूच, अजित पवारांनी आणखी एक धक्का 

दरम्यान, नरसय्या आडम मास्तर हे कॉंग्रेसचे नेते सुशील कुमार शिंदे यांचे कट्टर विरोधक मानले जाते. आडम मास्तर सोलापुर शहारातून तीन वेळा आमदार राहिले आहेत. १९७८, १९९५ आणि २००४ च्या निवडणुकीत नरसय्या आडम यांनी विजय मिळावलेला होता. यातच २००९ च्या निवडणुकीत कॉंग्रेसच्या प्रणिती शिंदे यांनी त्यांचा पराभव केला होता. त्यानंतर २०१४ आणि २०१९ च्या निवडणुकीत देखील प्रणिती शिंदे यांनी आडम मास्तरांचा पराभव केला आहे.

मात्र लोकसभेच्या निवडणुकीत हे सर्व चित्र बदललं असून नरसय्या आडम आणि सुशील कुमार शिंदे एकत्र आल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे सोलापुर मध्य विधानसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडी आता आडम मास्तरांना मदत करणार की वेगळी भूमिका घेणार ? ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

READ ALSO :

हेही वाचा…“बहिणीला विधानपरिषद मिळाली, आता भावाला देखील राज्यसभा मिळणार” 

हेही वाचा..“प्राधिकरणाच्या मालमत्ता होणार फ्री होल्ड ;” महेश लांडगे यांनी मांडलेल्या लक्षवेधीवर सामंताचं उत्तर 

हेही वाचा…“सभागृहात उद्यापासून त्याच आक्रमकतेने …” अंबादास दानवेंचं निलंबन मागे 

हेही वाचा…वसंत मोरेंचा ठाकरे गटात प्रवेश , विधानसभेसाठी ठाकरेंकडे मोरेंनी दिलेल्या दोन पर्यायात इच्छूकांची प्रचंड गर्दी 

हेही वाचा..इंदापुरात हर्षवर्धन पाटलांचं ठरलं, अजित पवार गट काय भूमिका घेणार ? 

Leave a Reply