IMPIMP
Hemant Soren's 149-day struggle got justice today Sharad Pawar made 'this' demand to the NDA government Hemant Soren's 149-day struggle got justice today Sharad Pawar made 'this' demand to the NDA government

“हेमंत सोरेन यांच्या १४९ दिवसांच्या लढ्याला आज न्यायाचा मार्ग मिळाला”, शरद पवारांनी एनडीए सरकारकडे केली ‘ही’ मागणी

मुंबई : झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना झारखंड उच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. आंचल जमीन घोटाळा प्रकरणात हायकोर्टाने त्यांना जामीन मंजूर केला आहे. या प्रकरणाची सुनावणी १३ जून रोजी पुर्ण झाली होती. त्यानंतर न्यायालयाने निर्णय राखून ठेवला होता. न्यायमुर्ती रंगन मुखोपाध्यय यांच्या खंडपीठासमोर हे प्रकरण होते. त्यावर आता शरद पवारांनी एनडीएसरकारकडे मोठी मागणी केलीय.

हेही वाचा..“तीनवेळा प्रयत्न केला, आता माघार नाही”? रमेश कोंडे भाजपच्या आमदाराची खोची करणार ? 

झारखंड राज्याचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना राजकीयदृष्ट्या  प्रेरित खटल्यात तुरूंगवास भोगावा लागला. १४९ दिवसांच्या लढ्याला आज न्यायाचा मार्ग मिळाला. सोरेन यांना न्यायालयाने दिलेल्या जामीनामुळे सत्याचा विजय हा जास्त दुर नाही अशी भावना दृढ झाली आहे. एनडीए सरकारकडे आमची मागणी राहिल की सुड भावनेने कोणतीही कारवाई न होता संविधानानुसार लोकशाहीची भरभराट होईल, अशई कामगिरी करावी. असं शरद पवारांनी म्हटलं आहे.

हेही वाचा..“अजित पवारांनी अन्याय केला का नाही ? “भाजप नेते हर्षवर्धन पाटलांचं मोठं विधान

दरम्यान, ईडीने रांचीमध्ये लष्कराच्या ताब्यात असलेल्या ४.५५ एकर जमिनीच्या बेकायदेशीर खरेदी-विक्रीची चौकशी सुरू केली. या प्रकरणी ईडीनं रांचीच्या बडागार्डन झोनचे महसुल उपनिरीक्षक भानू प्रताप प्रसाद यांना अटक केली होती. त्यांच्या राहत्या घरातून मोठ्या प्रमाणात सरकारी कागदपत्रं आणि मोबाईलही त्यावेळी जप्त करण्यात आले होते. त्यानंतर ईडीने आपला मोर्चा हेमंत सोरेन यांच्याकडे वळवला.

READ ALSO :

हेही वाचा…शेकापच्या जयंत पाटलांना कॉंग्रेस अन् शरद पवार गटाचा पाठिंबा, परंतु ठाकरे गट…? 

हेही वाचा..फडणवीस अन् ठाकरेंचा एकाच लिप्टमधून प्रवास, ठाकरे महायुतीत जाणार का ? 

हेही वाचा..भाजपकडून विधानपरिषदेच्या ०५ जागांसाठी ११ नावांचा विचार..! कुणाला मिळणार संधी ? 

हेही वाचा..भाजपच्या स्थानिक नेत्यांची अजितदादांवर नाराजी, 18 ते 19 आमदार शरद पवारांच्या संपर्कात 

हेही वाचा..“महाराष्ट्राचं राजकारण सहानुभतीवर चालतं, विधानसभेतही चालणार “

Leave a Reply