IMPIMP
Narendra Modi with Rohit Sharama Narendra Modi with Rohit Sharama

“वर्ल्ड कप जसा मोदींनीच जिंकलाय, असा त्यांचा वावर”, विरोधकांची मोदींवर जहरी टिका

मुंबई : विश्वविजेता ठरलेल्या भारतीय क्रिक्रेट संघांचं काल मुंबईत मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आलं. तब्बल १७ वर्षानंतर भारताकडे विश्वचषक आल्याने अवघ्या देशभरातून आनंद व्यक्त केला गेला. यानिमित्ताने भारतीय संघासाठी मुंबईत मरिन लाईन ते वानखेडे स्टेडिअम दरम्यान विजयी रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. यासाठी गुजरातमधून बस आणण्यात आली होती. यावरून विरोधकांनी सरकारवर जोरदार टिका केली. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी देखील यावरून टोलेबाजी केली आहे.

हेही वाचा…“बहिणीला विधानपरिषद मिळाली, आता भावाला देखील राज्यसभा मिळणार” 

भारतीय क्रिकेट टीमला भेटायला मोदींकडे वेळ आहे. त्यांना भेटलंच पाहिजे. त्यांनी भेटू नये असं मी म्हणत नाही. त्यांना आशीर्वाद दिले पाहिजेत. परंतु ज्या राज्यातून लोकसभेतून निवडून आले आहात. त्या राज्यातील सर्वात मोठा अपघात घडला आहे. तिथं तुम्ही जात नाहीत. मणिपुरलाही तुम्ही गेला नाहीत. मग काय करू शकता? त्यांच्या स्वागतासाठी गुजरातमधून बस आणावी लागली याचा अर्थ काय ? आपल्या ताफ्यात अशा बसेस आहेत. नसती तर एका रात्रीत बनवून घेतली असती. एवढी मुंबईची क्षमता आहे. गुजरात आहे म्हणून देश आहे. असं दाखवून देताय का ? असा सवाल देखील राऊतांनी केलाय.

हेही वाचा..“प्राधिकरणाच्या मालमत्ता होणार फ्री होल्ड ;” महेश लांडगे यांनी मांडलेल्या लक्षवेधीवर सामंताचं उत्तर 

संजय राऊत म्हणाले की, पंतप्रधानांच्या संवेदनशीलतेवर सतत प्रश्नचिन्ह उपस्थित होतो. जिथे उत्सव, आनंद असतो, जिथं जय असतो. तिथे पंतप्रधान जातात. आपल्या निवासस्थानी सर्वांना बोलावतात. जसं काय ती ट्राफी त्यांनीच जिंकलीय. असा त्यांचा वावर आहे. पण जिथं संकट आहे. समस्या आहे. लोक त्रासले आहेत. हाथरस, मणिपुरसारख्या ठिकाणी पंतप्रधान कधीच जात नाहीत. असा टोलाही त्यांनी लगावला.

READ ALSO :

हेही वाचा…कॉंग्रेसची ताकद वाढली, ‘सहा’ आमदारांनी मध्यरात्री कॉंग्रेसमध्ये केला जाहीर प्रवेश 

हेही वाचा…“रोहित शर्मासह, सुर्यकुमार यादव, जैस्वाल, दुबेंचा सत्कार,” द्वेषाचे राजकारण करणाऱ्यांना आतातरी सुबुद्धी येवो

हेही वाचा…पुण्यात झिका व्हायरसचा धुमाकुळ, श्रीनाथ भिमालेंनी आयुक्तांना लिहिले पत्र 

हेही वाचा…“रोहित शर्मा, विराट कोहलींची मिरवणूक मुंबईच्या बेस्ट बसवरून काढा”, रोहित पवारांची मागणी 

हेही वाचा…कट्टर विरोधक, लोकसभेला साथ दिली, आता विधानसभेचं वेध, कॉंग्रेस जागा सोडणार का ? 

Leave a Reply