IMPIMP
How is the political journey of the Mohols from an ordinary worker to a cabinet minister directly How is the political journey of the Mohols from an ordinary worker to a cabinet minister directly

“एक सामान्य कार्यकर्ता ते थेट कॅबिनेट मंत्रीपद”, कसा आहे मोहोळांचा राजकीय प्रवास ?

मुंबई : नरेंद्र मोदी आज तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत.  यातच राज्यातून भाजपच्या नऊ जागा जिंकून आल्या आहेत. यातच काही खासदारांना केंद्रात मंत्रीपदाची लॉटरी लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यातच पहिल्यांदाच खासदार झालेल्या पुण्यातील मुरलीधर मोहोळ यांना मंत्रीपदासाठी फोन आल्याची माहिती समोर येत आहे.

हेही वाचा…“बारामतीत कुणी धमक्या देत असेल तर त्याचा करेक्ट कार्यक्रम करणार”, सुप्रिया सुळेंचा अजित पवारांना इशारा

आज सांयकाळी राष्ट्रपती भवनात पार पडत असलेल्या मंत्रीपदाच्या शपथविधीसाठी राज्यातून नितीन गडकरी, पीयुष गोयल, रक्षा खडसे, प्रतापराव जाधव, रामदास आठवले, मुरलीधर मोहोळ यांना पंतप्रधान कार्यालयातून फोन आले आहेत. आज सकाळी अकरा वाजता नवनिर्वाचित मंत्र्यांना चहापानासाठी बोलवण्यात आले आहे. त्यामुळे एक सामान्य कार्यकर्ते ते खासदार आणि केंद्रात कॅबिनेट मंत्री असा मोहोळांचा प्रवास राहणार आहे.

२०१४ मध्ये केंद्रात भाजपचे सरकार आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पुण्यावर विशेष लक्ष राहिले आहेत. केंद्रात सत्ता स्थापनेनंतर लगेचच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्मार्ट सिटी योजनेची घोषणा केली होती. त्यात पुणे देशात दुसऱ्या क्रमांकावर होते. त्यानंतर या योजनेची सुरूवात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत पुण्यातूनच करण्यात आली.

हेही वाचा..“ही प्रभू श्रीरामांचीच लीला..!”, प्रभू श्रीरामचंद्र वनवासात असताना ज्या ज्या ठिकाणी गेले तिथे भाजपचा पराभव

त्यानंतर मेट्रो प्रकल्प, नदी सुधार योजना, समान पाणी योजनेसाठी केंद्राचा निधी अशा अनेक मोठ्या योजनांमध्ये पुण्याचा समावेश राहिला असून मागील वर्षी पुण्याला जी २० परिषेचा मानही देण्यात आला. त्यामुळे आयटीनगरी, क्रीडा नगरी, उद्योग नगरी, म्हणून वेगाने विकसित होणारे पुणे शहर असल्याने पंतप्रधान मोदींकडून अनेकदा पुण्याबाबत गौरवौद्गार काढण्यात आले आहेत. त्यातच आता केंद्रातील अनेक मंत्र्यांना या लोकसभा निवडणुकीत पराभव पत्कारावा लागल्याने भाजपकडून पुण्याला मंत्रीपद दिले जाण्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तविण्यात येत आहे.

 

मुरलीधर मोहोळ यांचा राजकीय प्रवास 

– राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक…

– गणेशोत्सव मंडळाचे सक्रिय कार्यकर्ता…

– बूथ प्रमुख म्हणून भाजपामध्ये कामाला सुरुवात…

– युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष आणि सचिवपदाचीही संधी…

– संघटनेत ३० वर्षे कार्यरत… – सांस्कृतिक-क्रीडा क्षेत्रातही योगदान…

– २००२, २००७ आणि २०१७ साली कोथरुडमधून नगरसेवक

– २०१७ : साली स्थायी समिती धुरा…

– २०१९ : पुण्याच्या महापौरपदीसंधी…

– कोरोना काळात विविध पातळ्यांवर भरीव काम

– २०२० : अखिल भारतीय महापौर परिषदेच्या उपाध्यक्षपदी…

– २०२२ : सरचिटणीस, महाराष्ट्र भाजपा

– २०२२ : पश्चिम महाराष्ट्राची भाजपाची जबाबदारी

– ४ जून, २०२४ : खासदार, पुणे

READ ALSO :

हेही वाचा…“मोदींच्या नव्या मंत्रिमंडळात अजित पवार गटाला स्थान नाही”, दिल्लीत मोठी खलबतं 

हेही वाचा..पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांना केंद्रात मंत्रीपदाची लॉटरी, आज मंत्रीपदाची शपथ घेणार ? 

हेही वाचा…“शरद पवारांना मी सोडायला नव्हतं पाहिजे होतं”, कुणी केली खंत व्यक्त 

हेही वाचा..ठरलं तर मग..! येत्या एक दोन आठवड्यात मंत्रिमंडळाचा विस्तार होणार ? 

हेही वाचा..महालक्ष्मी रेसकोर्सची जमीन घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांच्या अन् भाजपच्या बिल्डर-कंत्राटदार मित्रांना सोपवायचा मनसुबा