IMPIMP
How many seats will Ajit Pawar, Shinde group get in the elections How many seats will Ajit Pawar, Shinde group get in the elections

अजित पवार, शिंदे गटाला किती जागा मिळणार ? पृथ्वीराज चव्हाणांनी थेट आकडाच सांगितला

मुंबई : लोकसभेची निवडणूक ही लोकांनीच हाती घेतली असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घोषणा त्यांच्याच अंगलट आल्या आहेत. एकूणच भाजपला सध्या बहुमताचा २७२ चा आखडाही गाठणे कठीण जाईल अन् केंद्रात सत्ताबदलाची शक्यता स्पष्टपणे दिसत आहे. असा दावा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. त्याचबरोबर राज्यात महाविकास आघाडीला ३२ ते ३५ जागा मिळण्याची शक्यता देखील त्यांनी व्यक्त केलीय.

हेही वाचा..“मुख्यमंत्र्यांकडून अपघाताची जबाबदारी झटकण्याचा पळकुटेपणा आम्हाला मान्य नाही”, वर्षा गायकवाडांचा हल्लाबोल

लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पृथ्वीराज चव्हाण यांनी महत्वाचे भाष्य केलं. यातच राज्यातील ३२ ते ३५ जागा महाविकास आघाडीच्या निवडून येतील. अजित पवार गटाची एकही जागा निवडून येणार नाही. तर शिंदेंच्या तीन ते चार जागा निवडून येऊ शकतात. यातच कॉंग्रेसचे १२ उमेदवार निवडून येण्याचा अंदाज चव्हाणांनी व्यक्त केलाय.

हेही वाचा…“अरविंद सावंताचा मोठा करिश्मा, विरोधात उमेदवार हुडकायला ..,” जयंत पाटलांची जोरदार टोलेबाजी 

2019 च्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत त्यांच्या जागा वाढतील असे एकही राज्य दिसत नाही. या वेळी भाजपला २७२ जागाही मिळणार नाहीत. अब की बार चारसो पार ही घोषणा मोदींच्या अंगलट आली आहे. त्यांनी स्वत: चे व्यक्तिस्तोम माजविले आहे. २०७४ पर्यंत विकसित भारताची संकल्पना मांडताहेत. मात्र त्याची स्पष्टता नाही, मंदिराचा मुद्दा चालला नाही. त्यामुळे त्यांनी आता द्वेषाचे व धार्मिक धुव्रीकरणाचे राजकारण सुरू केले आहे. अशी टिका देखील चव्हाण यांनी म्हटलंय.

READ ALSO :

हेही वाचा…अजित पवारांनी शरद पवारांची साथ का सोडली ? देवेंद्र फडणवीसांनी दिलं ‘हे’ उत्तर 

हेही वाचा..“नवमतदारांचं मत आम्हालाच,’ गुलाबराव पाटलांनी जळगावात ठोकला मोठा दावा 

हेही वाचा..“देशात मोदींची लाट नाही, मग मोदी विरूद्ध राहुल गांधी अशी निवडणूक का केली ?” देवेंद्र फडणवीस म्हणाले…

हेही वाचा…“मी एकटा बसतोय, ते तिघं येऊ द्या,” अन् आदित्य ठाकरेंनी दिलं मोठं चॅलेंज 

हेही वाचा…पुण्यात कॉंग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकरांच्या विरोधात गुन्हा दाखल, प्रकरण काय ?